Pune NCP | पालिकेतील सत्ताधाऱ्यांची ‘कायदेशीर’ गोची करणाऱ्या नगरसेवक अ‍ॅड. भय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नगरसेवक अ‍ॅड. भय्यासाहेब जाधव (Corporator Adv. Bhayyasaheb Jadhav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका सभागृहामध्ये नागरी प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण आवाज उठवून सत्ताधाऱ्यांची ‘कायदेशीर’ गोची करण्यात अग्रेसर राहिल्यानेच अ‍ॅड. जाधव यांची प्रवक्ते पदी नियुक्ती (Pune NCP) केल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी आज सकाळी शहर कार्यकारिणीची घोषणा केली.
वकिली पैशातून राजकारणात प्रवेश केलेले अ‍ॅड. भय्यासाहेब जाधव यांनी 2017 मध्ये वडगाव शेरी मतदार संघातील खराडी चंदननगर परिसरातून निवडणूक लढविली आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले.

अगदी सुरवातीपासूनच सभागृहात विविध प्रश्नांवर मुद्देसूद मत मांडून त्यांनी अवघ्या काही महिन्यातच सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
एवढेच न्हवे तर विविध प्रश्नांवर अभिनव आंदोलनं करून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
कायद्याचे विशेषतः महापालिका अधिनियमांचे उत्तम ज्ञान असल्याने सत्ताधाऱ्यांची वेळोवेळी कोंडी करून विरोधी पक्षाची ताकद दाखवण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात.

सभागृहाबाहेर देखील सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून वागणारा सर्वसामान्य नगरसेवक म्हणून ऍड. जाधव परिचित आहेत.
अभ्यासू वृत्ती आक्रमकतेमुळे प्रश्न तडीस नेण्याची त्यांची हातोटी आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने वडगाव शेरी मतदार संघासोबतच शहराच्या विविध प्रश्नांवर पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात निश्चितच ऍड.. जाधव यशस्वी ठरतील अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू झाली आहे.

 

Web Title : Pune NCP | Corporator Adv .. Bhayyasaheb Jadhav elected as spokesperson of NCP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आई नीलम राणेंविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी

Pune Rape Case | पुणे स्टेशन परिसरात आईजवळ झोपलेल्या 6 वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करुन बलात्कार

Anti Corruption Pune | लाचखोर सहायक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला 5 दिवसांची पोलिस कोठडी