Pune NCP | चंद्रकांत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Pune NCP) वतीने निषेध करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) व महात्मा फुले (Mahatma Phule) यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

 

‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’ , ‘चंद्रकांत पाटील हाय हाय’ , ‘चंद्रकांत पाटील यांचे करायचे काय..? खाली डोकं वर पाय’, ‘वाचाळवीर भाजपचा (BJP) धिक्कार असो’, अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

 

1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर एकूण 63 वर्षांत वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळ्या पक्षांची सरकारे या महाराष्ट्रात स्थापन झाली. परंतु इतक्या वर्षांमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने अथवा नेत्याने जे चुकीचे धाडस केले नाही ते धाडस राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते धाडस करत महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र म्हणून जगभरात आहे. त्या महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या, अशा प्रकारचे अवमानजनक वक्तव्य पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. अशा प्रकारचे चुकीचे वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा अवमान केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (Pune NCP) केला आहे.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले की, छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांचा आवमान केल्याने भारतीय जनता पार्टीने चंद्रकांत पाटील यांची तात्काळ मंत्री मंडळातून हकलपट्टी करावी आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार (Atrocities Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात यावा. तसेच भारतीय जनता पार्टीने संपूर्ण राज्याची माफी मागावी, अशी मागणी प्रशांत जगताप यांनी यावेळी केली. तसेच इथून पुढे कुठल्याही राष्ट्रपुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विरोधात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारादेखील देण्यात आला.

 

यावेळी प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh), बंडू केमसे (Bandu Kemse),
दीपाली धुमाळ (Deepali Dhumal), लक्ष्मी दुधाने (Laxmi Dudhane), हर्षवर्धन मानकर (Harshvardhan Mankar),
किशोर कांबळे (Kishore Kamble), दीपक जगताप (Deepak Jagtap), सुषमा सातपुते (Sushma Satpute),
गिरीश गुरनानी (Girish Gurnani), मिलिंद गिरीश गुरुनानी (Milind Girish Gurunani),
ऋषिकेश कडू (Rishikesh Kadu), नीलेश शिंदे (Nilesh Shinde), नवनाथ खिल्लारे (Navnath Khillare),
आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | File an atrocity case against Chandrakant Patil, Pune NCP demands

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई