Pune NCP | अजित पवार यांच्या उपस्थितीत गौरव घुले यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत बिबवेवाडी (Bibwewadi) येथील सामाजिक कार्यकर्ते (Social Activist) गौरव गणेश घुले यांनी (Gaurav Ganesh Ghule) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (Pune NCP) जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे (Former Mayor Dattatraya Dhanakwade), पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

 

अजित पवार यांनी गौरव गणेश घुले यांच्या कार्याचे कौतुक करत या युवा कार्यकर्त्यांच्या फळीमुळे राष्ट्रवादी पक्ष (Pune NCP) अधिक सक्षम होईल. या भागातील नागरिकांच्या समस्यांची जाण गौरव घुले यांना असल्याने येथील विकासकामे करण्यास त्यांचा सहभाग महत्वाचा राहील, असे त्यांनी सांगितले.

 

बिबवेवाडी व बालाजीनगरच्या (Balajinagar) विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
देशाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारांचा वारसा घेऊन अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आगामी काळात बालाजीनगर आणि परिसरात समाजकारण आणि राजकारण (Politics) यांचा उत्तम संयोग साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वस्व पणाला लावून समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाला विचारत घेऊन काम करायचे आहे. आगामी पालिका निवडणुकीत Pune Municipal Corporation Elections (PMC Elections) देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकणार याचा मला विश्वास आहे, असे गौरव घुले यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title :- Pune NCP | Gaurav Ghule joins NCP in the presence of Ajit Pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, रिकव्हरी रेट 98 % , जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Russia-Ukraine War | वैद्यकीय शिक्षणासाठी यूक्रेनला का जातात भारतीय मुले?, ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे

 

Maratha Reservation | मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत घेतलेले 15 महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या