Pune NCP | राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी गिरीश गुरुनानी यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Pune NCP) कोथरूड (Kothrud) युवक राष्ट्रवादी अध्यक्षपदी आज स्थानिक युवा नेते गिरीश गुरूनानी (Girish Gurunani) यांची निवड करण्यात आली.

 

एका सामान्य व अराजकीय घरातील कार्यकर्त्याच्या असामान्य सामाजिक आणि राजकीय कार्याची दाखल घेत कोथरूड मधील राष्ट्रवादीच्या (Pune NCP) दिग्गज नेत्यांनी अध्यक्षपदासाठी गुरूनानी यांच्या नावाला समर्थन दर्शविले. पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर (Pune Former Deputy Mayor Deepak Mankar), शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap), कोथरूड राष्ट्रवादी अध्यक्ष हर्षवर्धन मानकर (Harshvardhan Mankar) व शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे (Kishor Kamble) यांनी गुरूनानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केली.

 

कोथरूड भागात गुरूनानींचा अनेक आंदोलनात सहभाग होता. इंधन दरवाढ (Fuel Price Hike) व पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) अनियमित कारभारविरोधात केलेल्या अनोख्या आंदोलनाने त्यांना युवकांची पसंती मिळवून दिली. तसेच अंधशाळा व एड्स ग्रस्त (AIDS) मुलांसाठी करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल पक्षाने घेतल्याचे सूत्रांकडून कळते.

 

पद मिळाल्यानंतर युवांचे प्रश्न आणखीन प्रखरतेने समाजासमोर मांडून अत्यंत जबाबदार
पणे त्यावर तोडगा काढण्याचे कार्य करणार असल्याचे गुरूनानी यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

Web Title :- Pune NCP | Girish Gurunani as President of NCP Youth Congress Kothrud Assembly constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

K Chandrashekar Rao | तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आणि CM उद्धव ठाकरे यांच्यात ‘चाय पे चर्चा’, भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीचे संकेत

 

Bharatiya Mazdoor Sangh | असंघटित, कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार. संघाची पुणे जिल्हा अधिवेशनात घोषणा

 

Pimpri Corona Update | मोठा दिलासा ! पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी