Pune NCP | बालगंधर्वमधील घटना पुणे शहराच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी – प्रशांत जगताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची (Beating) घटना पुणे शहराच्या (Pune City) राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी असल्याचे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांनी म्हटले. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन (Agitation) करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

देशाची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष (Political Parties) व राजकीय नेते (Political Leaders) यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता (Code of Conduct) जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठल्या महिला भगिनीवर हात उचलल्यापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाची मजल आजपर्यंत गेली नाही. परंतु दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व (Balgandharva) येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या कार्यक्रमांमध्ये आपले निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) महिला भगिनींना पुणे भाजपच्या (BJP) चार ते पाच कार्यकर्त्यांनी अक्षरशः जोर-जोरात फटके मारले त्यांचा पदर ओढण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून पुण्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे.

राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणी मध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे, त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. असे असताना काल घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत आज निषेध आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या निषेध आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधीजींच्या (Mahatma Gandhi) प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत काळ्या रंगाच्या फिती लावत सुमारे एक तास शांतपणे बसून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, कार्यकर्त्यांनी कुठल्याही आंदोलनात कसे वागावे याबाबतची आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवून दिली असून कुठल्याही आंदोलनात वैचारिक मतभेद असले तरी विचारांची लढाई विचारानेच लढली गेली पाहिजे. प्रत्येक आंदोलन हे आदर्श आंदोलन झाले पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. आम्हाला तशी शिकवण आम्हाला पवार साहेबांनी घालून दिलेली आहे.

असे असताना आमच्या महिला भगिनींना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असून या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. त्या आरोपींवर परवा गुन्हा (FIR) दाखल झाला असून पोलीस प्रशासनास (Pune Police) विनंती आहे की, सदर आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी, या कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला जाईल की पुन्हा कोणीही अशा प्रकारची गैरवर्तन करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. परवा ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे गैरवर्तन झाले त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी साधी दिलगिरी देखील व्यक्त केली.

नाही याउलट यापुढील काळात यापेक्षा उत्तमप्रकारे प्रत्युत्तर काढण्याची भाषा करत असतील तर ते एक प्रकारे महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची पाठराखण करण्यासारखेच आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणविसांनी, भाजप सारख्या पार्टी विथ डिफरन्सचा नारा पिटनाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी भाषा करणे खरोखरच अशोभनीय आहे. या गोष्टीचा देखील आम्ही या मूक आंदोलनात निषेध व्यक्त करत असल्याचे जगताप यांनी सांगितले.

या आंदोलनात प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,
अंकुश काकडे (Ankush Kakade),
वैशाली नागवडे (Vaishali Nagwade),
काँग्रेसचे (Congress) रमेश बागवे (Ramesh Bagwe),
मोहन जोशी (Mohan Josh),
संगीता तिवारी (Sangeeta Tiwari),
शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे (Gajanan Tharkude),
संजय मोरे (Sanjay More),
आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party)
मनोज माने (Manoj Mane),
बाबुराव चांदेरे (Baburao Chandere),
प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh),
मृणालीनी वाणी (Mrinalini Van),
सदानंद शेट्टी (Sadanand Shetty),
आप्पा रेणूसे (Appa Renuse),
उदय महाले (Uday Mahale),
किशोर कांबळे (Kishore Kamble),
सुषमा सातपुते (Sushma Satpute),
विक्रम जाधव (Vikram Jadhav),
दयानंद इरकल (Dayanand Irakal),
दिपक कामठे (Deepak Kamthe),
विनोद पवार (Vinod Pawar),
निलेश वरे (Nilesh Vare)
आदींसह मोठ्या अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Web Title : Pune NCP | Incidents in Balgandharva defame the political culture of Pune city – Prashant Jagtap

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त