अजित पवारांकडून हर्षवर्धन पाटलांबाबत ‘खुलासा’, शिवसेनेलाही दिलं ‘प्रत्युत्तर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधरण सभा दोन दिवसांपूर्वी पुण्यात पार पडली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. व्यासपीठावर बसताना अजित पवार यांनी शेजारी असलेल्या नावाची पाटी बदलून हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची पाटी ठेवली. हर्षवर्धन पाटील यांना त्यांनी आपल्या शेजारी बसवून घतले होते. यावर अजित पवार यांनी खुलासा केला आहे.

अजित पवार म्हणाले, सध्या मी साधा आमदार असल्याने प्रोटोकॉलनुसार स्वत:जागा बदलून घेतली होती. थेट मुख्यमंत्र्यांशेजारी बसणे प्रोटोकॉलला धरुन नव्हते. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या नावाची पाटी बदलल्याबबातचा खुलासा त्यांनी केला. तसेच हर्षवर्धन पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. हातची सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटीलांचे दु:ख मी समजू शकतो.

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने गाय मरत नाही, अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला. यावेळी त्यांनी विजयसिंह मोहितेंवर बोलणे टाळले.
शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे श्रेय घेण्याचा कोणताही वाद नाही. सर्वांना माहित आहे की हे महाविकास आघाडीचे सरकार आहे, असे सांगत शिवसेनेच्या पोस्टरबाजीवर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/