Pune NCP | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | पुणे विद्यापीठाच्या Savitribai Phule Pune University (SPPU) अधिसभा निवडणूक प्रक्रियेसाठी महाविकास आघाडीने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही निवडणूक पूर्ण ताकतीनीशी लढविणार आहे. (Pune NCP)

 

गेल्या अनेक वर्षांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठात एका विशिष्ट विचाराच्या लोकांची सत्ता आहे. विद्यापीठाचा कारभार लोकाभिमुख होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना मदत होणारी मदत केंद्र त्यांच्या सोयी सुविधा पुणे विद्यापीठासह नगर व नाशिक या केंद्रांवर विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय या सर्व बाबी लक्षात घेता महाविकास आघाडीने ही निवडणूक लढविण्याचे ठरवले असून , त्यानुसार या सर्व जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. (Pune NCP)

कोरोना महामारीच्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, युवासेना, एन. एस. यु.आय या विद्यार्थी संघटनांनी केलेली मदत. ऑफलाइन परीक्षा बाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय, कोविड काळात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, कोवीड काळात ज्या मुलांनी आपल्या पालकांना गमावले त्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारी नोकर भरतीस आलेला वेग असे अनेक चांगले निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले असल्याने पुणे विद्यापीठातील मतदान महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि हेच मुद्दे घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी यास निवडणुकीत उतरली असून या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे”, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडले आहे.

 

या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रविकांत वर्पे, सुनील गव्हाणे, गजानन थरकुडे,
राजेश पळसकर, शरद लाड, प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, मनोज पाचपुते यांसह पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | Mahavikas Aghadi will contest all the seats in Savitribai Phule Pune University General Assembly elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | चर्चा तर होणारच! श्रीकांत शिंदे, इम्तियाज जलील एकाच मंचावर; शिंदे म्हणाले ‘आम्ही तर…’

Rishabh Pant | स्टेडियम मध्ये टवाळ प्रेक्षकांनी ऋषभ पंतला उर्वशीच्या नावाने डिवचलं अन्…

Vivek Agnihotri | आता ‘या’ चित्रपटात 90% स्थानिक नागरिक करतील काम; विवेक अग्निहोत्री यांचे मोठे विधान