Homeताज्या बातम्याPune NCP | अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्राचे 'शालेय शिक्षणमंत्री' करा, राष्ट्रवादी महिला...

Pune NCP | अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्राचे ‘शालेय शिक्षणमंत्री’ करा, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे उपरोधक आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टीईटी घोटाळ्याचे (Maharashtra TET Scam) धागेदोरे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यापर्यंत पोहचल्याने व त्यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द झाल्याने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Pune NCP) आक्रमक झाला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांना राज्याचे ‘शालेय शिक्षणमंत्री’ (Minister of School Education) करावे म्हणून उपरोधक पध्दतीने राष्ट्रवादीच्या वतीने (Pune NCP) आंदोलन करण्यात आले.

 

राष्ट्रवादी (Pune NCP) महीला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Female State President Vidya Chavan) यांच्या नेतृत्वाखाली डेंगळे पुल येथे आंदोलन (Agitation) करण्यात आले. या प्रसंगी बोलताना चव्हाण म्हणाल्या, ईडीच्या (ED) भीतीपोटी अनेक आमदार (MLA) भाजपामध्ये (BJP) सामील होत आहे. त्यामुळे हे सरकार गद्दाराचे आहे आणि गद्दारांकडून आणखी काय अपेक्षा असते ते आपल्याच घराचा उद्धार करणार, अशी टिका त्यांनी केली.

प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh) म्हणाले आमदार अब्दुल सत्तारांना भ्रष्टाचारी म्हणू नका. कारण ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघालेले आहेत आणि ते अत्यंत कुटुंबवत्सल आहेत. त्याप्रेमापोटी त्यांच्या मुलीं अपात्र असतानाही पात्र झाल्या आहेत आणि आपल्याच संस्थेवर त्यांनी त्यांना नोकरीही दिली, असे महान शिक्षणतज्ञ जर या राज्याला शिक्षणमंत्री म्हणून लाभले तर या ईडी सरकारच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला जाईल. तसेच पुढील काळात अनेक नापास विधार्थी ही पास होतील व अपात्र विद्यार्थांना खुप मोठ्या संधी उपलब्ध होतील अशी बोचरी टीका प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी यावेळी केली.

 

यावेळी विद्या चव्हाण, प्रवक्ते प्रदीप देशमुख, वैशाली नागवडे, मृणालिनी वाणी, विद्या ताकवले, दिलशाद अत्तार,
लोचन शिवले, शीला भालेराव, शारदा सोडी, उषा घोगरे, सारिका पारेख, वैजंती घोडके,
राजेश्वरी पाटील व इतर महीला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Web Title :- Pune NCP | Make Abdul Sattar ‘Minister of School Education’ of Maharashtra, NCP Mahila Congress protest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | इंदापुर पोलीस ठाण्यात FIR ! लग्नादिवशी प्रियकर पळाला, मुलाच्या मामाने मुलीला विषारी पेढा भरवला अन्…

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

 

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News