Pune NCP | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात ‘राष्ट्रीय फेकू दिवस’ साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Pune NCP) वतीने स्वारगेट (Swargate) येथील चौकात 1 एप्रिल हा दिवस ‘एप्रिल फूल’ ऐवजी ‘राष्ट्रीय फेकू दिवस’ म्हणून साजरा केला. या अभिनव आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची प्रतीकात्मक भूमिका साकारणाऱ्या युवकाने इतर युवकांच्या बेरोजगारी (Unemployment), महागाई (Inflation) या सर्व मागण्यांना उत्तर म्हणून गाजर वाटले .

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Pune NCP) शहराध्यक्ष किशोर कांबळे (Kishor Kamble) म्हणाले, सहाजिकच गेल्या सात वर्षांपासून दोन कोटी रोजगार देण्याची भाषा करत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने (BJP Government) नव्याने रोजगार दिलेच नाही किंबहुना नोटबंदी ,जीएसटी (GST), कोविड आपत्ती (Covid Disaster) या सर्व परिस्थितीमध्ये तरुणांचे आहे ते रोजगार गेले आहेत. या सर्व परिस्थितीला केवळ आणि केवळ केंद्रातील मोदी सरकारची (Modi Government) चुकलेली धोरणे (Policies) कारणीभूत आहेत, असा थेट आरोप किशोर कांबळे यांनी केला.

 

या आंदोलन प्रसंगी “मोदीजी आम्हाला रोजगार द्या”, “मोदीजी आम्हाला नोकऱ्या द्या”, “रोजगार हवे-गाजर नको” अशा सर्व घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh), मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, राकेश कामठे, आनंद सगरे, अमोल ननावरे, संतोष नांगरे, गिरीश गुरुनानी, किरण खैरे, गोविंद जाधव, स्वप्नील जोशी, तालिब मदारी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | Nationalist Youth Congress celebrates ‘National Throw Day’ against Modi government


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | प्रशासकाच्या कार्यकाळातही महापालिकेच्या ‘वित्तिय समितीचे’ अस्तित्व कायम ! आयुक्तांनी पुढील आठवड्यात समितीच्या बैठकीचे केले आयोजन

Kirit Somaiya | सोमय्यांनी शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याविरोधात थोपटले दंड

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात कुरिअरने आल्या तलवारी

Aryan Khan Drugs Case | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ

PMC Gunthewari | पुणे महापालिकेने गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली

Delhi Saket Court | ‘मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवर जावई, नातवांचा हक्क’ – कोर्टाचा महत्‍वपूर्ण निर्वाळा

PMC Gunthewari | पुणे महापालिकेने गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली

Dilip Walse Patil | ‘भाजप नेत्यांवर कारवाई का करत नाही?’ शिवसेनेच्या सवालानंतर गृहमंत्री म्हणाले…