Pune NCP | राष्ट्रवादीकडून पुण्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; 204 युवक-युवतींना मिळाली रोजगाराची संधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | पुणे शहर व परिसरातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत सुदामराव जगताप (NCP City President Prashant Jagtap) यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ झाला.

 

 

यावेळी त्यांनी मुलाखतीसाठी आलेल्या सर्व युवक युवतींना शुभेच्छा दिल्या. युवा पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (Pune NCP) हातभार लागावा ही अत्यंत समाधानाची बाब असून अशाच विविध उपक्रमांतून हा प्रयत्न यापुढेही सुरू असेल हा विश्वास यावेळी प्रशांत जगताप (Corporator Prashant Jagtap) यांनी व्यक्त केला. या रोजगार मेळाव्यास शहरातील युवा वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या अंतर्गत तब्बल २०४ युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या रोजगार मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख (NCP Pradeep Deshmukh), शहर उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, संदीप बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे, समन्वयक महेश हांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

 

Web Title :- Pune NCP | NCP organizes grand job fair in Pune; 204 youths got employment opportunities

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pension साठी LIC कार्यालयात जाऊन जमा करावे लागणार नाही Digital Life Certificate, असे होईल काम

 

Vitamin C Deficiency | सावधान ! ‘या’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस, दात आणि त्वचेला धोका; दृष्टी होते कमी

 

Pune Crime | लोणी काळभोरच्या हद्दीतून गुटख्याच्या 150 पोत्यांसह 81 लाखाचा माल जप्त; पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई