Pune NCP | भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडू लागताच सूड बुद्धीने कारवाई, प्रशांत जगतापांचा भाजपवर हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या विरोधात तसेच महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीद्वारे (ED) सूड बुद्धीने केलेल्या कारवाईच्या विरोधात भाजप सरकारचा (BJP Government) निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने बालगंधर्व चौक (Balgandharva Chowk) येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

 

स्व. यशवंतराव चव्हाण (Late. Yashwantrao Chavan) यांनी महाराष्ट्राला विनयशील राजकारणाचा समृद्ध वारसा दिला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्व नेत्यांनी तो वारसा जपला आणि वाढवला. भारतीय जनता पार्टीने मात्र या परंपरेला हरताळ फासत सुडाचे राजकारण सुरु केले. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची (Corruption) प्रकरणे बाहेर पडू लागताच भाजपच्या वतीने केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) खाली खेचण्याचा प्रयत्न होत आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी याचा तीर्व आंदोलन करत भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा मागितला यावर प्रतिक्रिया देताना ‘नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) मंत्रिमंडळातील 63% मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, म्हणून राजीनामा मागायचा असेल तर आधी नरेंद्र मोदींचा राजीनामा (Resignation) मागावा’ अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपाली धुमाळ (Deepali Dhumal), प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh),
मृणालिनी वाणी (Mrinalini Vani), रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil), किशोर कांबळे (Kishore Kamble),
सुषमा सातपुते (Sushma Satpute) यांच्यासह पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Pune NCP) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | NCP Prashant Jagtap After Nawab Malik Arrest On BJP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indian Currency | अचानक बाजारातून का गायब होत आहेत 2,000 रुपयांच्या नोटा, सरकारने सांगितले ‘हे’ कारण

 

Nawab Malik Net Worth | ईडीनं अटक केलेल्या मंत्री नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

 

EPFO | 6 कोटीपेक्षा जास्त कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! ईपीएफ क्लेमसाठी ई-नॉमिनेशनचे बंधन संपले