Pune NCP | ‘सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध’, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | केंद्र सरकार (Central Government) अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन (Fuel) व डिझेल दरवाढीच्या (Diesel Price Hike) विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP) वतीने आंदोलन (Agitation) करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी गॅस सिलेंडरला (Gas Cylinder) प्रतीकात्मक पद्धतीने फासावर लटकवले. तसेच “मोदी तेरा अजब खेल सस्ती दारु, मेहेंगा तेल”, “मोदी सरकार (Modi government) हाय हाय”, “सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

 

 

यावेळी बोलताना पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, 2014 साली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार (Corruption) अशा अनेक मुद्यांचे भांडवल करत भारतीय जनता पार्टी सत्तेत (BJP) आली. सत्तेत आल्यानंतर मात्र ज्या सर्वसामान्य भारतीयांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवले, त्या सर्वसामान्य जनतेचा मात्र भाजपला विसर पडला. त्यावेळेस 300 रुपयांना मिळणारा सिलेंडर आज तब्बल 1000 रुपयांवर गेला आहे. पेट्रोल, डिझेल यांच्या दराने शंभरी पार केली आहे. तरीसुद्धा सातत्याने दररोज हे दर वाढवून सर्वसामान्यांची लुटमार ही सुरूच आहे. निवडणुका (Elections) आल्या की दर स्थिर ठेवायचे, निवडणुका गेल्या पुन्हा सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकायचा, हीच खरी भाजपची नीती आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. इथून पुढच्या काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास (Candidate) पराभूत करत महागाई विरोधातला हा राग आपण व्यक्त करावा असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh),
संदीप बालवडकर (Sandeep Balwadkar), महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, संतोष फरांदे, उदय महाले, काकासाहेब चव्हाण,
संतोष नांगरे, गणेश नलावडे, दिलशान आतार, अनिता पवार, शिल्पा भोसले यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | NCP protests in Pune against modi governement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Samantha Ruth Prabhu Viral Video | आजपर्यंत समंथाची ही बाजू कोणालाच नव्हती ठावूक, अखेर व्हिडिओमुळे झाला खुलासा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 9000 रुपयांची लाच स्विकारताना उप कोषागार अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

7th Pay Commission | मोदी सरकारने दिले फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे अपडेट ! इतकी वाढू शकते सरकारी कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी