Pune NCP | सत्ताधाऱ्यांनी महापालिकेची परंपरा मोडीत काढली, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

Pune NCP | NCP Pune City President Prashant Jagtap On Ruling BJP In Pune Municipal Corporation (PMC)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | पुणे महानगरपालिकेची Pune Municipal Corporation (PMC) मुख्य सभा ऑनलाईन माध्यमातून संपन्न झाली. पुणे महानगरपालिकेच्या परंपरेप्रमाणे महिन्यातील पहिली सभा ही दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात येते. ही परंपरा सत्ताधाऱ्यांनी मोडीत काढत यावेळी प्रथमच विविध विषय चर्चेस घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांनी केला आहे.

आज झालेल्या मुख्य सभेत वारजे (Warje) व बाणेर (Baner) येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयांच्या (Hospital) बाबतीतही चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यक्रम पत्रिकेत समावेश नसतानाही परिपत्रकाद्वारे ऐनवेळी वारजे व बाणेर येथील रुग्णालयांचा विषय चर्चेत समाविष्ट करण्यात आला. ऑनलाईन सभा (Online Meeting) असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) बहुतांश नगरसेवक (Corporator) या सभेस उपस्थित राहू शकले नाहीत, असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.

प्रशांत जगताप पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे शहराध्यक्ष म्हणून मीही या सभेस सुरुवातीची 10 मिनिटे हजर होतो, मात्र त्यानंतर सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ (Savitribai Phule Smarak, Ganj Peth) येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यास हजर राहण्यासाठी मला जावे लागले. प्रस्तुत रुग्णालयांची विषयांची पूर्ण माहिती महानगरपालिकेच्या विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनाही देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनीही मुख्य सभेत याबाबत काही भाष्य केले नाही पण ठरावाच्या बाजूने मतदान पण केले नाही.

कालच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे Anti Corruption Bureau (ACB) Pune याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्या तक्रारीला अनुसरून या विषयाला आमचा विरोधच आहे. माझ्यासह सभागृहातील अनेक ज्येष्ठ सदस्य गैरहजर असताना हा विषय चर्चेस घेण्यात आला.
मात्र पुढील आठवड्यात मुख्यमंत्री (CM), उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister),
नगरविकास मंत्री (Urban Development Minister), गृहमंत्री (Home Minister)
यांची भेट घेऊन हा ठराव निरस्त करुन या प्रस्तावाची सखोल चौकशी करण्याची
विनंती महाराष्ट्र शासनाकडे (Government of Maharashtra) करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
तसेच पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा (Robbery) टाकणारा कोणताही
कट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही जगताप यांनी दिला.

Web Title : Pune NCP | NCP Pune City President Prashant Jagtap On Ruling BJP
In Pune Municipal Corporation (PMC) 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या

 

Best Foods For Sound Sleep | रात्री शांतपणे झोपायचे असेल तर,
बिछान्यात जाण्यापूर्वी आवश्य खा ‘या’ 5 वस्तू

 

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा