Pune NCP | महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, तिकीट वाटपात ओबीसींना न्याय देणार; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आश्वासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय (OBC Political Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body Elections) होणार हे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांनी सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) आम्हाला आदर असल्याचे सांगत अशा प्रकारचा निर्णय होणे अपेक्षित नसल्याचे म्हटले आहे. तसेच महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal (PMC) Election) राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP) सज्ज असून तिकीट वाटपात ओबीसींना तिकीट दिले जाईल असे आश्वासन जगताप यांनी दिले.

 

प्रशांत जगताप म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगास (State Election Commission) ओबीसी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाचा आम्ही आदर करतो. अर्थात अशा प्रकारचा निर्णय होणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अपेक्षित नव्हते. महाराष्ट्रातील ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आग्रही भूमिका होती, आहे आणि यापुढेही राहील, असे जगताप यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ओबीसींना निवडणुकीतील राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आमची सुरू असणारी लढाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे. परंतु आज कोर्टाच्या निर्णयाचा मान राखत असताना निवडणुका कधी घ्यायच्या याबाबतचे सर्व अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने तत्काळ निवडणुका जाहीर केल्या, तर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Pune NCP) महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहे.

 

कोर्टाने जरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे जाहीर केले असले तरी,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिकीट वाटपात
ओबीसींना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार आहेत.
ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ न देण्याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेईल, असे आश्वासन प्रशांत जगताप यांनी दिले.

 

Web Title :- Pune NCP | NCP ready for municipal elections, will give justice to OBCs in ticket distribution; Assurance of City President Prashant Jagtap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा