Pune NCP | पाणी प्रश्नाबाबत आणि मिळकत कर वाढ रद्द करण्याबाबत राष्ट्रवादीचे पालिका आयुक्तांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | पुण्यातील पर्वती विधानसभा मदरासंघामध्ये (Parvati Assembly constituency) कमी दाबाने पाणी पुरवठा (Water Supply) होत असून काही ठिकाणी पाणी येत नाही. तसेच पुणेकरांवर लादलेला वाढीव मिळकत कर रद्द करावा अशा मागण्याचे निवेदन पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Pune NCP) वतीने पालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या उपस्थित आयुक्तांना निवेदन दिल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष नांगरे (Santosh Nangare) यांनी दिली.

काय म्हटले निवेदनात ?

पर्वती विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागात विशेष करून प्रभाग क्रमांक 39 व 40 मधील आंबेडकर नगर, प्रेम नगर, गुलटेकडी, महर्षी नगर डायस प्लॉट येथील वसाहती तसेच सोसायटी भागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी तर पाणीच येत नाही. याबाबत अनेकदा संबंधित खात्याकडे तोंडी लेखी तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली नसल्यामुळे 01 एप्रिल रोजी स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयावर (Swargate Water Supply Office) महिलांचा हंडा मोर्चा देखील काढला. त्यापूर्वी दोनदा स्वारगेट पाणी पुरवठा ठिकाणी धरणे आंदोलन (Agitation) करुन देखील तात्पुरत्या स्वरूपात तक्रारीचे निराकरण केले जात आहे. परंतु दोन दिवसानंतर पुन्हा त्याच समस्या तक्रारी उद्भवत आहेत. (Pune NCP)

तसेच पुणे शहरातील 8 लाख घरांना जी मिळकत करामधे (Income Tax) 40 टक्के सवलत (Concession) देण्यात येत होती ती अचानकपणे पुर्णपणे बंद करण्यात आले. त्यामुळे त्याचा नाहक भार पुणेकरांवर लादण्यात आलेला आहे. अगोदरच कोरोनामुळे मेताकुटीला आलेल्या पुणेकरांना पुणे महानगरपालिकेच्या (PMC) वतीने मदत करण्याऐवजी अशी जुल्मी मिळकत कर लादून एकप्रकारे पुणेकरांची लूट सुरु करण्यात आल्याची संतप्त भावना सर्व पुणेकरांमधे पसरलेली आहे. त्यामुळे केलेली मिळकत कर वाढ ही तात्काळ मागे घ्यावी व यामधुन पुणेकरांना सवलत देवुन पुर्वीच्या पध्दतीने मिळकत कर घेण्यात यावा.

 

1. तरी पुणे महानगरपालिका मिळकत करामधे करण्यात आलेली वाढ मागे घेण्यात यावी.

2. सदर पाण्याची समस्या (Water Problem) आपण तात्काळ कायमस्वरुपी सोडवावी.

3. कचरा रोजच्या रोज उचलला जावा त्याचे ढीग तेथेच लावले जातात ते थांबवावे इत्यादी मागण्या आपण न सोडविल्यास बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय (Bibwewadi Regional Office), पुणे-सातारा रोड, पुणे मनपा येथे सोमवार (दि.9) पासुन चक्री उपोषण करण्यात येईल.

सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप प्रवक्ते अंकुश काकडे प्रदीप देशमुख रवींद्र माळवदकर ,
भगवानराव साळुंके, संतोष नांगरे मृणालिनी वाणी शशिकला कुंभार विपुल मैसुरकर इत्यादी प्रमुख उपस्थित होते .

Web Title : Pune NCP | NCP’s letter to Pune Municipal Commissioner regarding water issue and cancellation of property tax hike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला