Pune NCP | PM नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ‘मोदी गो बॅक’ आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येत्या 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर (Pune Tour) येत आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे आणि पुणे मेट्रोचे (Pune Metro) लोकार्पण करणार आहेत. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP) पक्षाकडून ‘मोदी गो बॅक’चा नारा (Modi Go Back) देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या महाराष्ट्रासंदर्भातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Pune NCP) आंदोलन केले जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्यांकडून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच त्यांच्या स्वराज्य भूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा वारंवार अपमान (Insult) केला जात आहे. अगदी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना (Corona) काळाचा संदर्भ देत स्वराज्यभूमी महाराष्ट्राचा अपमान केला. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमधील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा घाट पुणे भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ‘मोदी गो बॅक’ आंदोलन 6 मार्चला संपूर्ण पुणे शहरात (Pune City) करणार आहे.

या महाराष्ट्र द्रोही भाजप सरकारने (BJP Government) दुटप्पीपणाने
आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे.
अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स,
बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे,
अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ता व प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) यांनी दिली.

 

Web Title :- Pune NCP | NCP’s ‘Modi go back’ agitation on the backdrop of PM Narendra Modi’s visit to Pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime | पोलीस हवालदाराची रेल्वेखाली आत्महत्या, नाशिक पोलीस दलात प्रचंड खळबळ

Urinary Tract Infections (UTI) | महिलांनी टॉयलेट सीटवर केली ही एक चुक तर ‘या’ आजाराला पडू शकतात बळी, डॉक्टरांनी दिला इशारा

Weight Loss | ‘या’ 5 ड्राय फ्रूट्सचा करा डाएटमध्ये समावेश, वेगाने वजन होईल नियंत्रित; जाणून घ्या