Pune NCP News | राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन! अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची बाईक रॅली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP News | अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर आता दोन्ही गट पक्षबांधणीच्या तयारीला लागले आहेत. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार दोघेही एक्शनमोडमध्ये आले असून पक्षसंघटना मजबूत करत आहेत. पुण्याला अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून नावाजले जाते. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) अजित पवार यांनी विकासकामे करुन नागरिकांच्या मनात राष्ट्रवादीपक्षाबद्दल प्रेम निर्माण केले होते. मात्र आता अजित पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये शरद पवार त्यांच्या गटाची ताकद वाढवताना दिसत आहेत. शरद पवारांचे विश्वासू आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी पिंपरी चिंचवडमध्ये आज (दि.18) बाईक रॅली (Bike Rally In Pimpri Chinchwad) काढली आहे. यावेळी अनेक भागांमध्ये स्वतः गाडी चालवून सहभाग घेतला आहे. काकांच्या बालेकिल्ल्यामध्ये पुतण्याच्या या शक्तिप्रदर्शनाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये दिसून येत आहे. (Pune NCP News)
पुणे जिल्ह्याबद्दलचा अजित पवारांचा जिव्हाळा आणि त्यांची ताकद ही सर्वश्रूत आहे. अनेकदा शरद पवारांनी त्यांच्या पिंपरी चिंचवडमधील विकासकामांचे कौतुक केले आहे. मात्र सध्या अजित पवार गट (Ajit Pawar Group) विरुद्ध शरद पवार गट (Sharad Pawar Group) असे चित्र पाहायला मिळत आहे. रोहित पवारांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठी बाईक रॅली काढली आहे. यावेळी त्यांनी भक्ती-शक्ती समूह शिल्पाला अभिवादन करून दुचाकी रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीमध्ये मोठा युवा वर्ग सहभागी झाला असून यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण झाले आहे. या रॅलीनंतर रोहित पवार हे सेना भवन या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) यांच्या गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. त्यांची मते जाणून घेणार आहेत. (Pune NCP News)
आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षातील दोन्ही गट अनेक ठिकाणी आपली ताकद मजबुत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या आधी पिंपरी चिंचवड पालिकेवर भाजपाची (BJP) सत्ता होती.
आता अजित पवारांनी भाजपासोबत युती केल्यामुळे त्यांना ही निवडणूक एकत्र लढावी लागणार आहे.
यावेळी जोरदार टक्कर देण्यासाठी शरद पवार गटाची तयारी सुरु झाली आहे.
यावेळी रोहित पवारांची ही पहिलीच बाईक रॅली पिंपरी चिंचवडमध्ये काढण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे पक्ष कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
तसेच शरद पवार गटाकडून नुकतंच शहराध्यक्ष म्हणून तुषार कामठे यांची निवड देखील करण्यात आली आहे.
त्यामुळे आगामी काळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये राजकीय लढाई बघायला मिळणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा