Pune NCP News | तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP News | कसबा पेठेतील अभिजीत राजेंद्र गुंड (Abhijeet Rajendra Gund) याचा ओंकारेश्वर धोबी घाट येथे डोक्यात झाडाची वाळलेली फांदी पडून दुर्दैवी मृत्यू (Death of a Youth) झाला. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली. या धोकादायक झाडाबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी (Pune NCP News) जुलै महिन्यात पुणे महानगरपालिकेकडे (Pune Municipal Corporation (PMC) तक्रार नोंदवली होती. या तक्रारीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडली. त्यामुळे तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा (FIR) दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष (NCP City President) प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल (DCP Sandeep Singh Gill) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मृत आभिजीत राजेंद्र गुंड यांच्या पाठीशी आई व भाऊ असे कुटुंब असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे या कुटुंबाचे मोठे नुकसान
झाले आहे. तरी निष्काळजीपणामुळे नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी
(PMC Officers) व कर्मचाऱ्यांवर (Employees) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृत
अभिजीत राजेंद्र गुंड यांच्या कुटुंबीयांना पुणे महानगरपालिकेकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP News) शिष्टमंडळाने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात
पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची आज (शुक्रवार) भेट घेतली.

या शिष्टमंडळामधे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे,
एड. स्वप्नील जोशी, केतन औरसे, श्री कामठे, सौरव गुंजाळ उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल