Pune NCP News | पुण्यातील राष्ट्रवादी भवनालाही फुटला हुंदका (Video)

Pune NCP News | Pune's Nationalist Bhavan also burst into flames (Video)
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरातील वडीलधाऱ्याचा अनपेक्षित निर्णय ऐकून सैरभैर झालेले शेकडो कार्यकर्ते पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात (Pune NCP News) जमा झाले. एक कान मुंबईतील घडामोडी जाणून घेण्यासाठी टीव्हीकडे होता. पवारसाहेबांनी काही निर्णय बदलला नाही आणि कार्यकर्त्यांना अक्षरशः हुंदका फुटला. (Pune NCP News)

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ही बातमी समजली आणि पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शरद पवार यांना साकडे घालण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्ते जमा झाले. प्रवक्ते प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh NCP) यांच्या प्रमुख उपस्थित सर्व कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर उपस्थीत होते.

 

 

याप्रसंगी बोलताना देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक परिवार आहे. पवारसाहेब हे घरातील वडीलधारे कर्ते आहेत. घरातील वडीलधारे कधीही रिटायर होऊ शकत नाही. त्यामुळे साहेब निर्णय बदलत देत नाही तोपर्यंत आम्हीही सर्वजन राजीनाम्यावर ठाम आहोत.

 

सगळ्याच कार्यकर्त्यांना यावेळी भावना अनावर झाल्या होत्या.अश्रू आवरत नव्हते.
राजीनामा मागे घ्या अशा घोषणा दिल्या जात होत्या. प्रवक्ते प्रदीप देशमुख, रविंन्द्र माळवदकर, सदानंद शेट्टी,
मुणालिनी वाणी, निलेश निकम, काका चव्हाण अजिंक्य पालकर, विक्रम जाधव, फईम शेख,
गुरूमितसिंग गिल व इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title :- Pune NCP News | Pune’s Nationalist Bhavan also burst into flames (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | पुणे पोलिसांकडून बनावट निकाहनामा बनवून तरूणीची बदनामी करणार्‍याला बुलढाण्यातून अटक

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा, म्हणाले – ‘मी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणार’ (Video)

Awami Mahaz Pune | आझम कॅम्पस : ‘अवामी महाज’ च्या ईद मिलन मध्ये रंगली संगीत संध्या !

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)