Pune NCP News | पुण्यात राष्ट्रवादीतर्फे आरबीआय कार्यालयासमोर दोन हजार रुपयांच्या नोटेचा श्रद्धांजली कार्यक्रम ! (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP News | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Reserve Bank of India (RBI) काल (दि.२०) अचानक दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून बाद केल्या. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नोटा जवळील बॅंकेत (Bank) जमा करण्यासाठी मुदत दिली आहे. मोदी सरकारच्या या सततच्या नोटबंदीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीतर्फे (Pune NCP News) नोटांना श्रद्धांजली वाहत आंदोलन करण्यात आले.

याआधीही २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा अवैध ठरवल्या होत्या. आता २००० रुपयांची नोट (2000 Rupee Note) देखील बाद झाली आहे. सत्ताधारी पक्षाकडून भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सतत नोटबंदी (Demonetization) करण्यात येत आहे. या नोटबंदी विरोधात विरोधकांनी (Opposition) सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात झाली आहे.

त्याच दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (Pune NCP News) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कार्यालयाबाहेर २ हजार रुपयांच्या नोटेला हार फुलं वाहत श्रध्दांजली (Tribute to 2000 Notes) वाहण्यात आली आहे. राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या श्रध्दांजली कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक १० लाख रुपये किंमतीच्या २ हजार रुपयांच्या नोटा फुटपाथवर ठेवून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.

आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी
५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला गेला.
त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून काळा पैसा (Black Money) बाहेर येईल असे सांगण्यात आले.
मात्र हो निर्णय निष्फळ ठरला व काहीच साध्य झालं नाही. उलट बँकेच्या रांगेत थांबून अनेक सामान्य नागरिकांचे
बळी गेले आहे. त्या सर्व बळीना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार होते. त्याबाबत नरेंद्र मोदी यांनी कधीच भूमिका
मांडली नाही. कर्नाटक (Karnataka) राज्यातील पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ हजाराच्या नोटा
चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. यातून काय साध्य होणार आहे.
हे आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावं, अशी मागणी देखील त्यांनी केली. (Pune NCP News)

Web Title :  Pune NCP News | Tribute program of two thousand rupees note in front of RBI office by NCP in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Online Free Ration Card | सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशन कार्डसाठी एजंटला पैसे द्यावे लागणार नाहीत; घरबसल्या मोफत मिळवा रेशन कार्ड, जणून घ्या प्रोसेस

Pune NCP Protest News | पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रिजर्व बॅंक ऑफ इंडियाच्या बाहेर 2 हजार रुपयांच्या नोटांना श्रद्धांजली (Video)