Pune NCP | राष्ट्रपुरुषांचा सतत अवमान हे RSS आणि भाजपचे व्यापक कारस्थान, प्रशांत जगताप यांचा भाजपवर हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे सूत्र वापरून इतिहासाची सतत मोडतोड करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) व्यापक कारस्थान असल्याचा आरोप पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काल औरंगाबादमध्ये (Aurangabad) केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान केला. त्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्रवेशद्वारात निषेध आंदोलन (Agitation) करण्यात आले, त्यावेळी जगताप बोलत होते.

 

प्रशांत जगताप म्हणाले, ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे सूत्र वापरून इतिहासाची सतत मोडतोड करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) आणि भारतीय जनता पक्षाचे व्यापक कारस्थान आहे. महान राष्ट्रपुरुषांचा सतत अवमान करणे व ज्यांचे इतिहासात काडीचे योगदान नाही त्यांचे उदात्तीकरण करणे ही भाजपची मोहीम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काल (रविवार) केलेलं वक्तव्य हे काही अनावधानाने केलेलं नाही, भाजपच्या व्यापक षड्यंत्राचाच तो भाग आहे. भगतसिंग कोश्यारींच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले. परंतु जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मावळे या स्वराज्यात आहेत तोपर्यंत हे षड्यंत्र कधीही यशस्वी होणार नाही, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

‘छत्रपतींचा आशीर्वाद’ म्हणत साळसूदपणाचा आव आणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते वास्तवात किती टोकाचे शिवद्रोही आहेत हे वारंवार सिद्ध होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा (Political Party) कार्यकर्ता होण्यापूर्वी आपण सगळेच शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे आहोत. हीच वेळ आहे सर्व मावळ्यांनी एकजूट होण्याची, भाजप व आरएसएसचे शिवद्रोही कारस्थान उधळून लावण्याची. यापुढे या मनुवादी विचारसरणीच्या विरोधातील आपला लढा अधिक तीव्र होणार आहे, मनुवादाचा समूळ नायनाट केल्याशिवाय आता आपण शांत बसायचं नाही असे प्रशांत जगताप यांनी म्हटले. तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना तयार राहावे असा इशाराही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे हडपसर मधील प्रभाग क्रमांक 23 येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक योगेश ससाणे (Corporator Yogesh Sasane) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत प्रस्ताव महापालिकेस दिला असून त्या प्रस्तावावर प्रभाग क्रमांक 23 मधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्याच प्रमाणे महापौरांनी (Mayor) देखील विशेषाधिकारात स्वाक्षरी करण्यास नकार दिला. शिवाय हा विषय स्थायी व मुख्य सभेत घेणार नसल्याचे सांगितले. या घटनेतून भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा उघड होत असून केवळ निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि नंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष पुणे महानगरपालिकेत घेत आहे.

या आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी भाजपला असा सूचक इशारा दिला की,
जर दोन दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही,
तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे (Ankush Kakade), विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal), नगरसेवक योगेश ससाने,
सचिन दोडके (Sachin Dodke), प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh),
युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, सुषमा सातपुते, विक्रम जाधव, गणेश नलावडे, दिपक कामठे, दिपक जगताप, निलेश वरें,
अमर तुपे आदींसह पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | Prashant Jagtap s attack on BJP is a constant conspiracy of RSS and BJP

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा