Pune NCP Protest | पुणे : राणेपुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे नेते आदरणीय शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबाबत अनुदार उद्गार काढणारे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले (Pune NCP Protest).

यावेळी प्रवक्ते प्रदिप देशमुख (NCP Pradeep Deshmukh), संतोष नांगरे (NCP Santosh Nagre), नितीन कदम (NCP Nitin Kadam), किशोर कांबळे (NCP Kishor Kamble), अमोल ननावरे (NCP Amol Nanavare) , अजिंक्य पालकर (NCP Ajinkya Palkar) , मूणालिणी वाणी , शशिकला कुंभार , सुशांत ढमढेरे , मंगेश जाघव ,संकेत शिंदे , प्रतिक कांबळे , बाळासाहेब अटल समिर पवार व पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune NCP Protest)

 

 

राणे बंधू (Rane Bandhu) हे सातत्याने पवार साहेबांवर अतिशय खालच्या भाषेत वक्तव्ये करीत आहेत. लोकशाहीत विरोधकांना टिकेचा अधिकार दिला आहे. तो त्यांनी अवश्य वापरावा परंतु आपले वडील देखील ज्यांच्या पायावर नतमस्तक होतात त्यांच्यावर खालच्या भाषेत टिका करताना राणे बंधू (Rane Brotheres) यांनी किमान लाज बाळगावी अशी टिका यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
राणे बंधू यांनी यापुर्वी अनेक वेळा मर्यादा सोडून वक्तव्ये केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता केवळ संसदीय लोकशाहीतील संस्कारामुळे शांत आहे परंतु जर तो भडकला तर राणे बंधूंना पळता भुइ थोडी होइल असा इशारा पक्षाचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी दिला आहे.

Advt.

Web Title : Pune NCP Protest | Pune: NCP Protest Against Nilesh And MLA Nitesh Rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News |  धक्कादायक! येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सहायक उद्यान निरीक्षक आणि उपलेखापाल लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune PMC News | रस्ते सुशोभीकरणासाठी मोठ्या कुंड्या आणि झाडांची खरेदी वादात ! कुंड्या आणि झाडांच्या किंमतीबाबत खातरजमा करूनच खरेदीचा निर्णय घेण्यात येईल – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Sonakshi Sinha | अभिनयातील ‘अ’ देखील येत नाही…; सोनाक्षी सिन्हावर ‘या’ अभिनेत्रीने केली जहरी टीका