Pune NCP | ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘थँक्यू टॅक्स पेयर’ बॅनर लावून निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune NCP | लसीचे डोस करदात्यांच्या पैशांवर खरेदी केले आहेत, असे असताना लसीकरणाच्या (Vaccination) माध्यमातून राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप सरकार (BJP government) करीत आहे. वास्तविक लसीकरणाचे विशेष योगदान पुनावाला (Poonawalla) यांचे आहे. खरेतर करदात्या जनतेचे आभार मानणे योग्य ठरेल. मात्र ‘लसीकरणाचे योगदान (Contribution) देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी (Banner) करत आहेत चूनावाला’ अशा शब्दात पुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस (Pune NCP) पुणे शहरच्या वतीने सरचिटणीस गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी निषेध व्यक्त केला.

 

कोरोना लसीकरण हे राष्ट्रीय अभियान आहे. रांगेत उभे राहून लस घेणाऱ्या जनतेच्या सहकार्याने हे अभियान शहरात पार पडत आहे.
कर भरणाऱ्या जनतेच्याच पैशातून लस विकत घेऊन, बॅनर बाजी करणाऱ्या मोदी सरकारने (Modi government) श्रेय घेण्याचे कारण काय. असा सवाल गिरीश गुरनानी यांनी उपस्थित केला आहे.

 

गिरीश गुरनानी म्हणाले, लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर (certificate) देखील पंतप्रधान मोदी यांचा फोटो ठेऊन जाहिरातबाजी करणे योग्य नाही.
या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोथरूड (Kothrud) आणि डेक्कन (Deccan) परिसरात ‘थँक्यू टॅक्स पेयर’
(Thankyou taxpayer) असे फलक लावून जनतेचे आभार मानले आहेत. भारतातील असहाय्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम मोदी सरकारने थांबवले पाहिजे.
सत्ताधारी पक्षाच्या धोरणांमुळे आणि बेजबाबदारपणामुळेच जनता भरडली जात आहे.
राष्ट्रवादी युवक काँगेस पुणे शहरचा सरचिटणीस म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो, असे गिरीश गुरनानी म्हणाले. (Pune NCP)

महाविकास आघाडी सरकारच्या योग्य धोरणाने राज्यात आणि शहरात लसीकरण मोहिमेत सहकार्य मिळाले.
परंतु त्याची जाहिरातबाजी करण्यात आली नाही. राजकीय भांडवल करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाला लस मिळवून देणे हिताचे ठरेल, असे गिरीश गुरनानी म्हणाले.

 

Web Title : Pune NCP | Punawala is contributing to vaccination and Chunawala is waving banners, NCP Youth Congress protests with Thank you tax pair banner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Legislative Council Elections | काँग्रेसचे सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, महाडिक यांची माघार

Maharashtra Rains | आगामी आठवडाभर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, IMD चा पुण्यासह 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

अवघ्या 22 हजारात 1 वर्षाच्या गॅरंटीसह खरेदी करा 82 kmpl मायलेजची Bajaj Discover 125, वाचा सविस्तर