Pune NCP | पुणे महापालिका : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अय्याज काझी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेची निवडणूक Pune Municipal Election (PMC Election) काही दिवसांवर आली असताना प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Pune NCP) प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष (Former PMC Standing Committee Chairman), उद्योजक (Entrepreneur) तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी (Social Workers) राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये (Pune NCP) प्रवेश केला.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे महानगपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अय्याज काझी (Ayyaz Qazi), उद्योजक गणेश घुले (Ganesh Ghule) व सामाजिक कार्यकर्ते गौरव घुले (Gaurav Ghule) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारांवर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Pune NCP) स्वागत करण्यात आले.

 

या प्रवेशावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), माजी महापौर दत्तात्रय धनकवडे (Former Mayor Dattatraya Dhanakwade), महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष निलेश निकम (Former Standing Committee Chairman Nilesh Nikam), बाळासाहेब बोडके (Balasaheb Bodke), सुरेश घुले, माजी नगरसेवक राजू साने (Former corporator Raju Sane) आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | Pune Municipal Corporation: Former Chairman of Standing Committee Ayyaz Qazi joins NCP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Volodymyr Zelensky – PM Narendra Modi | युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांची पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत; मोदींच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष

 

Bad Smell In Urine | तुमच्या लघवीला सुद्धा दुर्गंधी येते का? ‘या’ आजारांचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 130 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी