Pune NCP | माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांना इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | संसदरत्न खासदार व राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या प्रकरणी त्वरित माफी मागावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालतील, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (Pune NCP) शुक्रवारी (दि.27) देण्यात आला.

 

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (Pune NCP) सारसबाग (Sarasbhag) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध नोंदविण्यात आला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच, पाटील यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलनही (Agitation) करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Pune City President Prashant Jagtap), प्रदीप देशमुख (Pradip Deshmukh), मृणाल वाणी (Mrinal Vani), संतोष नांगरे (Santosh Nangre), स्वाती चिटणीस (Swati Chitnis), मनाली भिलारे (Manali Bhilare), वेणू शिंदे (Venu Shinde), अजिंक्य पालकर (Ajinkya Palkar), रुपाली पाटील (Rupali Patil) व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाचे (Kothrud Constituency) प्रतिनिधित्व करीत असलेले चंद्रकांत पाटील हे पुण्याची व महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम करीत आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींविरोधात व समस्त महिला वर्गाविरोधात त्यांनी केलेले वक्तव्य हे निषेधार्ह आणि तितकेच लाजीरवाणे आहे. ‘घरी जा, स्वयंपाक करा, मसणात जा’ ही त्यांची वक्तव्ये महिलांनी चूल व मूल इतक्या पुरतेच मर्यादित राहावे, त्यांना समाजकारणात व राजकारणात वाव नसावा, या मानसिकतेचे प्रदर्शन करणारे आहे. यातून चंद्रकांत पाटील व भाजपची मनुवादी वृत्ती दिसून येत आहे.
महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) पुरोगामी राज्यात अशा प्रकारची वृत्ती लादू पाहणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा आम्ही निषेध करतो.
चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा ते जिथे दिसतील तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला-भगिनी त्यांना घेराव घालतील.
त्यासाठी चंद्रकांत पाटील तयार राहावेत,’ असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगातप यांनी दिला.

 

Web Title :- Pune NCP | Pune NCP warns BJP leader Chandrakant Patil for Apologize

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता काय सीबीआयला विचारायला जाऊ? अजित पवारांचा खोचक सवाल

 

Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत पालिकेच्या मिळकत कर विभागाचे 751 कोटी 31 लाख रुपयांचे उत्पन्न

 

Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश; CBI नं मागितली होती 10 दिवसांची कोठडी