Pune : कोंढव्यात पाणी पुरवठा वाढवून मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा, कात्रज परिसरात अनियमित व विस्कळीत पाणी पुरवठा होत असून खराडी, नगर रोडला सध्या मिळणारे १३० एमएलडी पाणी भामा आसखेड प्रकल्पानंतर हे पाणी कोंढवा, कात्रज, हडपसरला मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली.

हडपसर विधानसभा क्षेत्रातील नागरी समस्यांबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे व स्थानिक नगरसेवकांसह महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत बैठक झाली.

या बैठकीला विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेविका वैशाली बनकर, बंडु तात्या गायकवाड, प्रकाश कदम, नंदा लोणकर, योगेश ससाणे, हमिदा सुंडके, अमृता बाबर, गणेश ढोरे, परविन शेख, अविनाश काळे, मनोज घुले, संजीवनी जाधव, माजी नगरसेवक राईस सुंडके, हाजी फिरोज शेख, सुनिल बनकर, श्रीनिवास बोनाला, व्ही. जी. कुलकर्णी, अनिरुद्ध पावसकर, हडपसर विधानसभा अध्यक्ष नारायण लोणकर, पठाण जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे उपस्थित होते.

दरम्यान कोंढवा भागामध्ये वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे जागो जागी वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त होत आहे. शिवनेरीनगरमधील १८ मीटर डी. पी. रस्ता अनेक महिन्यांपासून रखडलेला आहे. त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे, या रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. ती तातडीने हटवावीत. जोपर्यंत अनधिकृत बांधकामे थांबत नाहीत, तोपर्यंत कोंढव्यातील सर्व समस्या सुटणार नाहीत.

लष्कर पाणी पुरवठा केंद्रातून दोन तास पंपिग वाढून देण्यात यावे. शिवनेरीनगर भागामध्ये अनेक दिवसांपासून ३० लाख लिटरची पाण्याची टाकी बांधून तयार आहे. ती अद्याप सुरु करण्यात आलेली नाही, ती तातडीने सुरु करण्यात यावी, अशी मागणी मा. नगरसेवक रईस सुंडके, हाजी फिरोज यांनी केली आहे.

चौकाचौकात होणारी वाहतूक कोंडी, रस्त्याच्या कडेला पसरलेला कचरा, बीआरटीची झालेली वाताहात, बंद कचरा प्रकल्प अशा अनेक तक्रारीचा पाढा नगरसेवकांनी आयुक्तापुढे मांडला. आयुक्तांनी या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

You might also like