Pune NCP | विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात घरातून प्रोत्साहन दिले पाहिजे – दिलीप वळसे पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वानवडी विभाग यांच्या वतीने “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व वानवडी परिसरातील विद्यार्थ्यांना वही वाटप” हा कार्यक्रम आयोजित केला होता. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Former Home Minister Dilip Walse Patil) यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. (Pune NCP)

 

पूर्वीप्रमाणे आता आपल्याला किती टक्के गुण मिळाले याला फारसे महत्त्व राहिले नाही. परंतु, विद्यार्थी आपल्या आयुष्यात भविष्यात काय करू इच्छितो, त्याच्या आवडीचे कोणते क्षेत्र आहे याकडे घरातून लक्ष देत प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

 

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, गेल्या दोन वर्षांच्या कोविडच्या काळात ऑफलाइन पद्धतीने शिक्षण बंद असताना देखील उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीच्या जीवावर मिळेल ती ऑनलाईन शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी या कठीण कालावधीमध्ये परीक्षांमध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केली. अशी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हावा व त्यांना आणखी चांगला अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत व्हावी, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये या हेतूने वानवडी (Vanavadi) परिसरातील तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले आहे, असे मत प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेविका नंदा लोणकर (Former corporator Nanda Lonkar),
माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप (Ratnaprabha Jagtap), श्रीकांत पाटील, मारुतीराव (नाना) जगताप,
मोहसिन शेख, प्रफुल्ल जांभुळकर, शमिका जांभुळकर, शिवाजी शिंदे, अमोल बाचल, संजय भोसले आदी सहकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | Students should be encouraged from home in their fields of interest – Dilip Valse Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा