Pune NCP | महागाईसाठी तत्कालीन पंतप्रधानांना भाजपने बांगड्या पाठवल्या होत्या, तीच भेट सध्याच्या पंतप्रधानांना देण्याची वेळ आली; प्रशांत जगताप यांचा हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 2014 साली अवघ्या 5 रुपयांनी गॅस सिलेंडरची किंमत वाढून (Gas Cylinder Price Increase) 365 रुपये झाल्याने याच भाजपने (BJP) तत्कालीन पंतप्रधानांना (PM) महागाई साठी दोषी ठरवत बांगड्या पाठवल्या होत्या आज मात्र तत्कलिन परिस्थिती पेक्षा कितीतरी जास्त महागाई झाल्याने आजच्या पंतप्रधानांना देखील तीच भेट देण्याची वेळ आली आहे, असे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांनी म्हटले आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP) वतीने सेनापती बापट रोड (Senapati Bapat Road) येथे आंदोलन (Agitation) करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

 

2014 साली अवघ्या 5 रुपयांनी गॅस सिलेंडरची किंमत वाढून 365 रुपये झाल्याने रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या परंतु आज भाजप सरकारच्या काळात तब्बल 1002 रुपये गॅस सिलेंडर होऊन देखील चकार शब्द देखील न काढणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने (Pune NCP) सेनापती बापट रोड येथे आंदोलन घेण्यात आले. हे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले.

 

स्मृती इराणी आज एका पुस्तक प्रकाशनासाठी पुणे शहरात आल्या असता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गावर काळे झेंडे दाखवत घोषणा देत स्मृती इराणी यांचा निषेध केला. याप्रसंगी ‘महागाई ची राणी, स्मृती इराणी’, ‘स्मृती भाभी जवाब दो’ , ‘बहुत हुई महागाई की मार,चले जाओ मोदी सरकार’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप म्हणाले
की, देशातील प्रत्येक कुटुंब महागाईच्या झळा सोसत असताना केंद्रातील मोदी सरकार (Modi Government)
मात्र याची दखल घेत दिलासा देण्यास तयार नाही.
अश्या परिस्थितीमध्ये ज्या अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या महागाई विरोधी अभिनयावर विश्वास ठेवत ज्या सर्वसामान्य नागरिकांनी 2014 मध्ये भाजपला मतदान केले त्या नागरिकांना स्मृती इराणी यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या.
परंतु गेल्या 7 वर्षात गॅस सिलेंडरची किंमत 365 वरून तब्बल 1002 वर गेल्याने नागरिकांचा मोदी सरकार वर रोष असल्याचे आजच्या आंदोलनात पाहायला मिळत आहे.
2014 साली याच भाजपने तत्कालीन पंतप्रधानांना महागाई साठी दोषी ठरवत बांगड्या पाठवल्या होत्या
आज मात्र तत्कलिन परिस्थिती पेक्षा कितीतरी जास्त महागाई झाल्याने आजच्या पंतप्रधानांना देखील तीच भेट देण्याची वेळ आली आहे.

 

यावेळी जेष्ठ नेते अंकुश काकडे (Senior Leaders Ankush Kakade), वैशाली नागवडे (Vaishali Nagwade),
प्रदीप देशमुख (Pradip Deshmukh), निलेश निकम (Nilesh Nikam), किशोर कांबळे (Kishore Kamble),
मृणालिनी वाणी (Mrinalini Vani), रुपाली पाटील (Rupali Patil), उदय महाले (Uday Mahale),
गणेश नलावडे (Ganesh Nalawade), विक्रम जाधव (Vikram Jadhav), मानली भिलारे (Manli Bhilare),
राजू साने (Raju Sane), कार्तिक थोटे (Kartik Thote), अनिता पवार (Anita Pawar),
वैशाली थोपटे (Vaishali Thopte), रूतुजा देशमुख (Rutuja Deshmukh)
आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | The BJP had sent bangles to the then Prime Minister for inflation, it was time to give the same gift to the present Prime Minister; Prashant Jagtap’s attack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Smriti Irani In Pune | स्मृती इराणींच्या कार्यक्रमात BJP च्या कार्यकर्त्यांकडून NCP च्या महिला पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण

 

Home Remedies To Stop Hair Fall | ‘या’ दोन गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचा आणि केस होतील सुंदर; जाणून घ्या

 

Narayan Rane on Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते’ – नारायण राणे