Pune NCP | ‘5 वर्षे तुमची सत्ता होती, तुमचे मालक गृहमंत्री होते, तेव्हा का नाही सुचलं हे शहाणपण?’ पुणे राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते (NCP Spokesperson) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक (Arrest) केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपकडून (BJP) मलिक यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून ईडी विरोधात आंदोलन (Agitation) केलं जात आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विट करुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तर पाटील यांच्या ट्विटला पुणे राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP) पक्षाचे शहराध्य प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी ट्विट करुन उत्तर दिले आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांची यादी जाहीर केली आहे. यानंतर येत्या दोन दिवसांत अनेकांवर कारवाई होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘ज्या दिवशी 93 च्या बॉम्बस्फोटानंतर (Bomb Blasts) नेमलेल्या समितीचा अहवाल बाहेर येईल, त्यादिवशी अनेकांना तोंड दाखवण्याचीही जागा उरणार नाही. तसेच तुरुंगातही त्यांच्यासाठी जागा उरणार नाही’ असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करुन दिला आहे. त्यालाच पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करुन उत्तर दिले आहे.

पाच वर्षे तुमची सत्ता होती, तुमचे मालक गृहमंत्री (Home Minister) होते,
तेव्हा का नाही सुचलं हे शहाणपण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तर हा अहवाल, तो अहवाल, बैलगाडी भरुन पुरावे ही सगळी नाटकं फक्त सत्ता मिळवण्यासाठी असतात.
एकदा सत्ता मिळाली की चिक्की अन् तुरडाळ पचवण्यात तुमचा कार्यकाळ संपतो, असा टोलाही प्रशांत जगताप म्हणाले.

Web Title :- Pune NCP | why didnt you come up with this wisdom when you were home minister question from ncp chandrakant patil from pune prashant jagtap

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mutual Fund | सेवानिवृत्तीच्या नंतर दरमहिना मिळेल 2 लाख रुपयांची पेन्शन, जाणून घ्या कशी करायची आहे गुंतवणूक?

Pune NCP | PM नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ‘मोदी गो बॅक’ आंदोलन

ST Workers Strike | एसटी विलिनीकरण ! उच्चस्तरीय समितीच्या अहवालाबाबत राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात महत्वाची माहिती