Pune NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश

पुणे : Pune NCP Youth | शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील आरटीई मार्फत प्रवेशासाठी ऑनलाइन (RTI Online Application) अर्ज आता २५ मार्च २०२३ पर्यंत स्वीकारले जातील असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे काढण्यात आलेला आहे. ऑनलाइन प्रवेशांमध्ये मुदतवाढ मिळावी यासाठी अनेक पालकांनी मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हा विषय उचलून धरला होता. (Pune NCP Youth)
या विषयासंदर्भात गिरीश गुरनानी (Girish Gurnani NCP) अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा
(Kothrud Vidhansabha) यांनी शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीला अनुसरून प्राथमिक शिक्षण संचलनालयाने आवश्यक तो बदल करीत अनेक पालकांचा महत्वपूर्ण प्रश्न सोडविला आहे. समाजातील दुर्बल व वंचित घटकांना शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आरटीई योजना राबविण्यात येते. (Pune NCP Youth)
Web Title :- Pune NCP Youth | Extension of deadline for filling RTE Online Admission Form; Success to the demand of NCP Youth Congress
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune PMC Encroachment Department | बिल्डर युवराज ढमालेंच्या बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेची कारवाई