Pune NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षकांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळणे बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. पालकांना प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरताना वेबसाईटच्या विलंबामुळे फॉर्म भरण्यास उशीर होत होता…बऱ्याच पालकांच्या तक्रारी या संदर्भात आल्या होत्या. (Pune NCP Youth)

 

तसेच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत असे निदर्शनात येत आहे की अनेक एजंट लोक या योजनेच्या नियमावलीत पात्र नसलेल्या पालकांकडून पैसे मागून प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आमिष दाखवत आहेत. तरी प्रवेश प्रकिया कायदेशीर नियमानुसार करावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक, पुणे औदुंबर उकिरडे आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षक गणेश खाडे यांना सादर करण्यात आले होते. (Pune NCP Youth)

 

आरटीई प्रवेश प्रक्रियेत खरोखरच आर्थिक दुर्बल घटक पालक योजनेपासून वंचित रहात आहेत.
ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असली तरी अनेक ठिकाणी सुरु असलेल्या या एजंटगिरीला बळी पडून पालकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यात यावी.
खरोखर आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनाच या प्रक्रियेचा लाभ मिळावा. कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन प्रशासनाने द्यावे,
अशी मागणी या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करत आहोत असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

 

या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष मोहित बराटे देखील उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP Youth | NCP’s representation to the Deputy Director of Education and Superintendent of Primary Education to extend the last date for RTE online admission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

 

Chandni Chowk Bridge | जिल्हाधिकाऱ्यांकडून चांदणी चौक परिसरातील कामांची पाहणी; NDA चौकातील काम अंतिम टप्प्यात

Pune Crime News | धक्कादायक ! पत्नी व 8 वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या, टीसीएसमध्ये होता कामाला

Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार