पुण्यात संचारबंदीत 17 हजार नागरिकांनी साधला पोलिसांशी संपर्क

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संचारबंदी कालावधीत शहरातील नागरिकांना पुणे पोलिसांनी जाहीर केलेल्या व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर २ दिवसात तब्बल 17 हजार नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे. त्यात सर्वाधिक मदत ही रुग्णालयाबाबत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांना पोलिसांनी योग्य मदत केली.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस देश लॉकडाऊन केला. तर राज्यात सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे बंद केले गेले. पण अश्या कालावधीत देखील अनेकांना नेहमीच्या ट्रीटमेंट, अचानक आलेल्या अडचणीमुळे बाहेर पडावे लागते. तर अनेकजण परगावावरून शिक्षणासाठी पुण्यात राहतात. लॉकडाऊन असल्याने मेस तसेच हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय येत नाही. पण बाहेर गेल्यानंतर पोलीस मारतील किंवा कारवाई करतील याभीतीने सर्वच चिंतेत होते.

दरम्यान या संकट काळात मदतीसाठी पुणे पोलिसांनी 4 व्हाटसअ‍ॅप क्रमांक प्रसिद्ध केले होते. तसेच काही अडचण असल्यास त्यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले होते. त्यांना योग्य ती मदत केली जाईल असे सांगण्यात आले होते.

त्यानुसार दोन दिवसात पोलिसांना शहरातील 17 हजार 497 नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे. त्यात आज (बुधवार) 5 हजार 683 नागरिकांनी संपर्क साधला आहे. यात 7 हजार 615 नागरिकांची तातडीने मदत करण्याची गरज होती. त्या सर्वांना पोलिसांनी मदत केली. तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून मदत केली गेली आहे.

यात सर्वाधिक रुग्णालयात जाण्यासाठी मदत मागण्यात आली. त्यात मधुमेह, कॅन्सर, अलजायर, डायलिसीस, गरोदर महिला या मदतीसाठी संदेस मिळाले आहेत. तर 20 टक्के संदेश शहरातील वेगवेगळ्या लॅब, नर्सेस यांना परवानगी देण्याबाबत होते. तर 5 टक्के संदेश हे हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे असून, त्यांच्या जेवणाबाबत होते. तर काही वृद्ध नागरिक व कुटुंबाला इतर ठिकाणी घेऊन जाण्याबाबत होते, असे सांगण्यात आले आहे.

पोलिसांना संदेश मोठ्या प्रमाणात येत असल्याने पोलिसांनी अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. 6 कर्मचारी आलेल्या संदेशाला उत्तर देण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्यात येत आहे.

लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आलेल्या कंपनी, उद्योग आणि इतरांच्या तक्रार निवारणासाठी पोलिसांनी pune city [email protected] यावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. त्यांनी यात विहित नमुन्यात माहीत दिल्यानंतर परवानगी किंवा इतर बाबी डिजिटल स्वरूपात दिल्या जाणार आहेत. तसेच, पोलिसांचे फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप आणि ट्विटरवर नवीन काही माहिती असल्यास दिली जात आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

You might also like