नांदेडसिटीजवळ भरदुपारी मुख्य रस्त्यावर कोयत्याच्या धाकानं लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड रोडवरील नांदेडसिटीच्या समोरच भरदुपारी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका दुचाकीस्वाराला कोयत्याचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून, एकजन फरार झाला आहे.

राज उर्फ दशरथ दत्तात्रय जाधव (वय 21, रा. गोसावी वस्ती, नांदेड फाटा, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याचा साथीदार पसार झाला आहे. अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याबाबत दिपक गुप्ता (वय 25) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वडगाव परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त नांदेडसिटी परिसरात गेले होते. त्यावेळी ते नांदेडसिटी समोरील रस्त्याच्या कडेला थांबले होते. यावेळी दोघेजन त्यांच्याजवळ आले. त्यातील राज उर्फ दशरथ जाधव याने कोयता दाखवत त्यांना धमकी दिली. तसेच, कोयता कंबेला लावून दुसर्‍याने खिशातील रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून नेला. मात्र, माहिती मिळताच घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी शोध घेऊन राज याला अटक केली. परंतु, त्याचा साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला आहे. याबाबत माहिती घेण्यास संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

You might also like