क्राईम स्टोरीपुणे

Pune Newlywed Couple Dies In Accident | दुचाकीवर झाड कोसळल्याने नवदाम्पत्याचा मृत्यू ; सात वर्षाची मुलगी गंभीर

पुणे / सासवड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Newlywed Couple Dies In Accident | सासवड- वीर रस्त्यावर (Saswad-Veer Road) दुचाकीस्वाराच्या अंगावर वडाचे झाड पडल्याने नवदाम्पत्याचा मृत्यू झाला तर 7 वर्षाची भाची गंभीर जखमी झाली आहे (Purandar News) . हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला. (Pune Newlywed Couple Dies In Accident)

रेनुकेश गुणशेखर जाधव (वय २९), व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव (वय २३) तर त्यांच्याबरोबर असलेलीय भाची ईश्वरी संदेश देशमुख (वय ७ सर्व रा परींचे) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, सासवड-वीर रस्त्यावरून जाधव दाम्पत्य आपली भाची ईश्वरी हिच्यासमवेत दुचाकीवरून सासवड कडून परींचे ला निघाले होते. त्यावेळी पिंपळे गावच्या हद्दीत आल्यानंतर रस्त्यालगत असलेले अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळले यामध्ये जाधव दाम्पत्य आणि ईश्वरी गंभीर जखमी झाली. स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही सासवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जाधव दाम्पत्याचा मृत्यू झाला होता तर ईश्वरी हिला अधिक उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. दरम्यान, जाधव दाम्पत्याचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title :  pune accident newlywed couple dies after falling tree on two wheeler niece serious in purandar saswad crime news

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

 

Back to top button