Pune News | महात्मा फुले अभिवादन मिरवणुकीत 10 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि आझम कॅम्पसमधील (Azam Campus Pune) संलग्न संस्थांच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आलेल्या अभिवादन मिरवणुकीत १० हजार विद्यार्थी सहभागी झाले. ही मिरवणूक मंगळवार, दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) ते महात्मा फुले वाडा मार्गावर काढण्यात आली. (Pune News)

मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तसेच डॉ. पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव इरफान शेख, शाहीद इनामदार, मशकूर शेख, साबीर शेख, सिकंदर पटेल, आसीफ शेख,वाहिद बियाबानी, गौस शेख अब्दुल वहाब, युसुफ शेख, प्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी सहभागी झाले. (Pune News)

महात्मा फुलें, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या वेशातील विद्यार्थी बग्गीत बसले होते.दरबार ब्रास बँड,बग्गी, बैलगाडी,महात्मा फुलेंचे सामाजिक संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी,पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक सहभागी झाले. विविध क्षेत्रातील यशस्वी आणि प्रेरक महिलांची वेशभुषा परिधान केलेल्या दहा विद्यार्थिनी या मिरवणुकीचे आकर्षण ठरल्या.

मिरवणुकीचा मार्ग आझम कॅम्पस, पूना कॉलेज, गोल्डन ज्युबली, काशीवाडी, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक, महात्मा फुले वाडा असा होता.

अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १९ वे वर्ष होते. दरवर्षी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’
( आझम कॅम्पस)च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर
यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Pramod Bombatkar | अ‍ॅड. प्रमोद बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP) पदाचा अतिरिक्त पदभार

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?