Pune News : पुण्यातील ससून रूग्णालयामध्ये म्युकोरमायकॉसिसच्या 100 शस्त्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – म्युकरमायकोसिस बहुतांश कोविड १९ होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आढळत आहे. कोविड आजाराच्या वेळी देण्यात आलेल्या स्टीरॉइड त्याच बरोबर, रुग्णाला असलेले मधुमेह, उच्चरक्त दाब, कर्करोग यासारखे इतर आजार आणि कमी प्रतिकार शक्ती असल्यास, या बुरशीचा सहजरित्या रुग्णांच्या नाकामधून शरिरामध्ये शिरकाव होतो . ही बुरशी पुढे जाऊन, डोळे व मेंदू मध्ये संसर्ग करते ज्यामुळे रुग्ण Patient दृष्टी किंवा प्राण गमावू शकतो. कोरोना महामारी पाठोपाठ म्युकोरमायकॉसीस म्हणजेच काळी बुरशीचा त्रास आता रुग्णांना भेडसावत आहे.

ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

पुण्याच्या ससुन सर्वोपचार रुग्णाल्यामध्ये म्यूकोरमायकॉसीसची महामारी सुरु झाल्यापासून, २०१ हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यात दररोज ७-८ नविन रुग्ण Patient भरती होत आहेत. दरम्यान, ससुन सर्वोपचार रुग्णालयाने म्युकोरमायकॉसीसचा शस्त्रक्रियेची शंभरी गाठली आहे. पुण्याच्या ससुन सर्वोपचार रुग्णालयामध्ये म्यूकोरमायकॉसीसची शंभरावी शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली आहे. या शस्त्रक्रिया मध्ये आता पर्यंत १०१ फेस व स्कलबेस ,२ क्रानियटोमी, २ कॅन्सर आणि म्युकोरमायकॉसीस चा केसेस यांचा समावेश होता. या व्यतिरीक्त ११ रुग्णांच्या मेंदूच्या रक्त वाहिनीमध्ये बुरशीचा संसर्ग असल्याने शस्रक्रिया करण्यात आली. आणि ४ रुग्णांच्या मेंदूमध्ये बुरशीमुळे पस झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली.

Coronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू

या पैकी बहुतांश शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत करण्यात आल्या.
तसेच, या आजाराच्या उपचारासाठी लागणऱ्या अंफोटरिसिनची व्यवस्था डॉ. भारती दासवानी प्राध्यापक व MPJAY प्रभारी अधिकारी यांच्यातर्फे उत्तमरित्या करण्यात आली.
या शस्त्रक्रियांसाठी डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससुन सर्वोपचार रुग्णालय, डॉ. अजय तावरे वैद्यकीय अधिक्षक व डॉ. विजय जाधव उपवैद्यकीय अधिक्षक यांचे अमूल्य सहयोग लाभले. या शस्त्रक्रिया डॉ. समिर जोशी, प्राध्यापक व विभाग प्रमुख, कान नाक व घसा शास्त्र विभाग यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गटात असलेल्या डॉ. राहूल तेलंग सहयोगी प्राध्यापक, डॉ. संजयकुमार सोनावले सहयोगी प्राध्यापक, डॉ. अफशान शेख, सहाय्यक प्राध्यापक, डॉ. किरीट यथाटी सहाय्यक प्राध्यापक, डॉ. चेरी रॉय यांनी या शस्त्रक्रिया पार पाडल्या. या बुरशीचा संसर्ग डोळयांना झाल्यामुळे दृष्टी गमावलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन नेत्रतज्ज्ञ डॉ. संजीवनी आंबेकर प्राध्यापक व विभाग प्रमुख आणि डॉ. सतिश शितोळे यांच्यातर्फे करण्यात आले.

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

‘ताकतच पहायची असेल तर…’ राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट