Pune News : चॉकलेटचे आमिष दाखवत 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाकडून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सुसंस्कृत शहराला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, चॉकलेटचे आमिष दाखवत ६५ वर्षीय जेष्ठ नागरिकांने ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यवस्तीमधील गंज पेठेत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी हुसेन सुलतान धोटेकर (वय ६५, रा. गंजपेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी दुपारी चारच्या सुमारास आरोपी हुसेनने हा अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचा बहाणा करत घरी घेऊन गेला. त्यांनतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. अधिक तपास महिला उपनिरीक्षक ज्योती कुटे करत आहेत.