Vaccination in Pune : पुण्यात ‘या’ 13 ठिकाणी होणार दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवार (1 मार्च) पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. लसीकरण सरकारी रुग्णालयात तसेच काही निवडक खासगी रुग्णालयात होणार आहे. लसीकरणासाठी आजपासून कोविड प्लॅटफॉर्मवर नोंदणी सुरु झाली आहे. पुण्यात देखील लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

कोरोना विरुद्धची ही लस चार टप्प्यामध्ये देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा पुरवणारे सेवक सरकारी व खासगी वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वार्डबॉय व सुरक्षा रक्षक यांना देण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे महानगरपालिका, पोलीस दल, गृहरक्षक अधिकारी व नागरी संरक्षण दल अधिकारी व कर्मचारी. तिसऱ्या टप्प्यात व्याधी ग्रस्त व्यक्ती (45 वर्षावरील) व 60 वर्षावरील ज्येष्ठ व्यक्ती, चौथ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

कोव्हिड – 19 लसीकरण मोहिम अंतर्गत 1 मार्च पासून दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. व्याधी ग्रस्त व्यक्ती (45 वर्षावरील) व 60 वर्षावरील ज्येष्ठ व्यक्ती यांनाच कोरोना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ज्या व्यक्ती 45 ते 59 वर्षापर्यंत कॉमोर्बिडीटी आहेत. अशा लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असणार आहे. लसीकरण नोंदणीसाठी संबंधीत व्यक्तीने जन्माचा दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट घेऊन येणे बंधनकारक असणार आहे.

ज्येष्ठ व्यक्तीसाठी लसीकरण केंद्र

1. कमला नेहरु हॉस्पिटल, मंगळवार पेठ

2. जयाबाई सुतार हॉस्पिटल, कोथरुड

3. राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा

4. ससून हॉस्पिटल, पुणे स्टेशन

मंगळवार (दि.2) पासून खालील सरकारी दवाखाने चालू करण्यात येणार आहेत

सरकारी लसीकरण केंद्र

1. गंगाराम कर्णे दवाखाना, नगर रोड

2. कळस दवाखाना, येरवडा

3. मालती काची प्रसूतिगृह, भवानी पेठ

4. बाबासाहेब आंबेडकर दवाखाना, डायस प्लॉट

5. बिंदू माधव ठाकरे, वारजे

6. बारटक्के दवाखाना, वारजे

7. भानगिरे दवाखाना, मोहम्मदवाडी

खाजगी लसीकरण केंद्र

1. औंध इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस, औंध

2. इनलॅक्स एन्ड बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क

खाजगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरणासाठी 150 रुपये व 100 रुपये प्रशासकीय खर्च असे एकूण 250 रुपये प्रति डोससाठी पैसे द्यावे लागणार आहेत.