Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात गरोदर महिलांन साठी कठिण प्रसंग होता. यावेळी केवळ ससून रुग्णालयात गरोदर महिलांना दाखल केले जात होते. ही महिलांची परिस्थिती बघून 2 मे रोजी सोनवणे हॉस्पिटल मध्ये कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला होता. या काळात 153 महिलांची डिलिव्हरी करण्यात आली. अशी माहिती पुणे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली.

अधिक माहिती देताना डॉ. भारती म्हणाले कि, पुणे मनपा च्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये एकूण 560 गरोदर महिला ऍडमिट होत्या. या मध्ये 153 महिलांची डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये झाली. या पैकी 110 महिलांचे सिझर करण्यात आले.

त्याचप्रमाणे बुधवार पासून कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. यासाठी 16 साईट चे नियोजन करण्यात आले आहे. यातील 9 साईट चे रजिस्ट्रेशन झाले आहे. यात 4 सरकारी व 5 खासगी रुग्णालयाचा समावेश आहे. असे ही भारती यांनी यावेळी सांगितले.