Pune News | पुण्यात मिळालेली प्राचीन नाणी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपुर्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | विहम (ता. खेड, जि. पुणे) येथे 15 ते 18 व्या शतकातील तांब्याची 147 नाणी आढळून आली होती. ती नाणी पुणे (Copper Coin Found in Pune) पुरातत्त्व विभागाचे (Pune Archaeological Department) सहायक संचालक विलास वहाने (Vilas Vahane) यांच्याकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) सुपुर्द करण्यात आली. (Pune News)

 

विहम येथे 4 जानेवारी 2022 ला सुयश रोकडे (Suyash Rokade) हा रोहिदास सावंत (Rohidas Sawant) यांच्या शेतात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी त्याला तेथे तांब्याची नाणी आढळून आली. याची माहिती तहसीलदारांना मिळताच त्यांनी ती नाणी ताब्यात घेतली. तसेच पुढील संशोधनासाठी ती नाणी पुरातत्व विभागाकडे दिली होती. संशोधन केल्यानंतर ही नाणी 15 ते 18 व्या शतकातील असल्याचे समोर आले. गुरुवारी सकाळी ही सर्व नाणी पुणे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांनी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपुर्द केली. (Pune News)

 

शिवराई ते ईस्ट इंडिया कंपनी –
विहम येथे आढळलेली नाणी ही 15 वे 18 व्या शतकातील असून, यामध्ये शिवराई नाणी, अकबर नाणी, बहामणी, सुलतान नाणी, निजामशाही नाणी व ईस्ट इंडिया कंपनीच्या नाण्यांचा समावेश आहे. एकूण 147 नाणी मिळाली असून त्यांचे वजन 2 किलो 40 ग्रॅम एवढे भरले आहे.

संग्रहालयात 2 वर्षांत जमा झालेला ऐतिहासिक ठेवा –
गेल्या दोन वर्षांमध्ये संग्रहालयात महत्त्वपूर्ण असा ऐतिहासिक ठेवा जमा झालेला आहे.
त्यामध्ये सातारा पोलीस वसाहत येथील पुरातन तोफ, इंदापूर येथील चांदीची 70 नाणी, पिंपरी चिंचवड येथील अडीच किलो सोन्याची नाणी,
अजिंक्यतारावरील लोखंडी तिजोरी, अजिंक्यतारावरील ब्रिटिशकालीन दोन खांब, पुणे येथील 147 तांब्याची नाणी आदींचा समावेश आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभीरक्षक प्रवीण शिंदे (Praveen Shinde) म्हणाले, ”गेल्या दोन वर्षात संग्रहालयात अनेक ऐतिहासिक वस्तू दाखल झाल्या आहेत. या सर्व वस्तूंचे नूतन इमारतीत संवर्धन केले जाईल.”

 

Web Title :- Pune News | 15th to 18th century coins found in pune will be conserved by the archaeological department at the satara museum

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा