Pune News | बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News । पुण्यातील किन्हई- बोडकेवाडी (Kinhai- Bodkewadi) येथील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाला आहे. वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना (बुधवारी) 14 जुलै रोजी पहाटे साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. आदेश सुरेश हगवणे (वय,17 रा. विठ्ठलनगर, देहूगाव) असं मृत तरुणाचे नाव आहे.  pune news | 17 year old boy dead while swimming dam in dehugaon

तरुणाच्या बुडाल्याची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
देहूरोड पोलिस ठाण्याचे (Dehuroad Police Station) पोलीस निरीक्षक विलास सोंडे (PI Vilas Sonde) आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
बंधाऱ्यात बुडलेल्या आदेशचा मृतदेह शोधण्यासाठी सुदुंबरे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला बोलावण्यात आलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कीं, आदेश हगवणे (Adesh Hagvane) आणि आणखी 4 जण असे पाच जण पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी बोडकेवाडी येथील बंधाऱ्यावर आले होते.
सर्वत्र पावसाने जोर धरल्यामुळे सर्व तलाव. बंधारे तुडुंब आहेत.
त्याचप्रमाणे सध्या मावळात देखील जोराचा पाऊस पडत आहे.
त्यामुळे इंद्रायणी नदीत (Indrayani river) मावळातील धरणांमधून पाणी सोडले गेले आहे.
पाण्याचा प्रवाह या परिसरात अधिक वेगाने वाहत आहे.
आदेशला या वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू (Death) झाला असल्याचा अंदाज देहूरोड पोलिसांकडून (Dehuroad Police Station) वर्तवण्यात आला आहे.

Web Title : pune news | 17 year old boy dead while swimming dam in dehugaon

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Praveen Darekar | ‘एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्याचा ‘महाविकास’चा डाव’

Yoga nidra | अनेक तासाची झोप पुर्ण होते योग निद्रामुळे, जाणून घ्या फायदे

Society Maintenance । सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील सर्व सदनिकाधारकांना एकसमान मेंटेनन्स