Pune News : जीम ट्रेनरकडून 19 वर्षीय तरूणीचा विनयभंग, कोंढव्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जीम ट्रेनरने 19 वर्षीय तरुणीला बॉक्सिंग शिकवण्याचा बहाणाकरून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढव्यात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी रॉबिन सायमन अँथनी (वय 28, रा. लष्कर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रेनरचे नाव आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबिन हा जिम ट्रेनर आहे. तो कोंढवा भागातील एका जिममध्ये प्रशिक्षक आहे. या जिममध्ये तरुणी व्यायाम करण्यासाठी येत होती. त्यामुळे या दोघांची ओळख होती. तरुणीला बॉक्सिंगची आवड आहे. त्यावेळी तरुणीला आरोपी रॉबिन याने मी बॉक्सिंग शिकवतो असा बहाणा केला. दरम्यान जिमची फी जास्त होती. यामुळे आरोपी रॉबिन याने तरुणीला घरी येऊन बॉक्सिंग शिकवतो, त्याबद्दल्यात 3 हजार रुपये ठरले होतो. आरोपी तिला घरी येऊन शिकवत असे. पण काही दिवसांपूर्वीपासून आरोपी रॉबिन हा तिला शिकवत होता. मात्र त्याने पिडीत तरुणीशी घाणेरड्या नजरेने पाहत तसेच तिला शिकवत असताना विनयभंग केला. तरुणीने याला विरोध केला असता तिचा पाठलाग करून त्रास दिला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.