Pune News | ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी 200 कोटींचा विशेष निधी; मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश, शहरातील नाल्यांच्या सीमा भिंतींचा प्रश्न सुटणार (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात विशेष निधी मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी तातडीने हा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी दिली. (Pune News)

पुणे शहरातील नाल्यांची कामे आणि सीमा भिंती बांधणे यासाठी महापालिकेचा निधी तांत्रिक अडचणींमुळे खर्च करता येत नव्हता. त्यामुळे सीमा भिंतींची कामे रखडली होती. नाला परिसरातील नागरिकांमध्ये पाऊस काळात चिंतेचे वातावरण होते.


म्हणून या कामासाठी राज्य सरकारच्या विशेष निधीची आवश्यकता होती, असे सांगत मोहोळ म्हणाले,
की उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन महापालिका क्षेत्रात मुलभूत
सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत.
उपलब्ध झालेल्या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण भिंती बांधल्या जाणार असून विशेषतः आंबील ओढा
परिसराला याचा मोठा फायदा होणार आहे. या सीमा भिंतींमुळे पूरपरिस्थितीत पाणी प्रवाही राहण्यास मदत होणार आहे.(Pune News)

मोहोळ म्हणाले, कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने २०१९ साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात
वित्त आणि मनुष्यहानी झाली. असा प्रकार टाळण्यासाठी सीमा भिंतींची कामे महत्त्वाची ठरणार होती.
त्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला, याचे नक्कीच समाधान आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra State Excise Department | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलिसांचा पुढाकार, दिशा भरकटलेली बालके खेळणार ‘स्लम सॉकर’ राष्ट्रीय स्तरीय फुटबॉल स्पर्धेत

Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar | मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पुन्हा इशारा, ”रोहित पवारांवर गुन्हा दाखल होणारच”

Prakash Ambedkar On Pune Lok Sabha | जालन्यातून जरांगेंना तर पुण्यातून डॉ. वैद्य यांना उमेदवारी द्या, ‘वंचित’ची मविआ बैठकीत मागणी, दिले ‘हे’ 4 प्रस्ताव