Pune News : मोहम्मदवाडी परिसरातील ‘ए-वन पार्क’ या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या, प्रेमसंबंधातून पाऊल उचलल्याची ‘सोशल’वर चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील वानवडी परिसरात एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. आत्महत्या का केली हे स्पष्ट झालेले नाही. तिचे एका सोबत प्रेम संबंध असल्याची चर्चा परिसरात असून, त्याबाबत पोलीस आता तपास करत आहेत.

पूजा चव्हाण (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा येथील मोहम्मदवाडी येथे गल्ली क्रमांक 10 येथील ‘ए-वन पार्क’ या उच्चभ्रू इमारतीत राहत होती. दरम्यान, रात्री तिच्यासोबत दोन मित्र होते. अचानक पूजा हिने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात ती गंभीर जखमी झाली. मित्रांनीच तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, तरुणीचे व एका सोबत प्रेम संबंध असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. तर सोशल मीडियावर हा मॅसेज व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मात्र याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले आहे. तिच्या आई-वडिलांना बोलवण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. त्याबाबत वानवडी पोलिस तपास करत आहेत. तिचे मित्र ससून रुग्णालयात असून, त्यांच्याकडे आता पोलीस तपास करणार आहेत.