Pune News : पुण्यात एकाच दिवशी विवाहितेच्या छळासंदर्भातील 3 गुन्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यासारख्या शहरात नव विवाहिताना माहेरहून पैसे आण्यासाठी छळले जात असून, एकाच वेळी अश्या वेगवेगळ्या भागात तीन घटना घडल्या आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर एका घटनेत कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे.

प्रगती विशाल बराटे (वय 30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसानी पती विशाल मनोहर बराटे (वय ३२) व तुषार मनोहर बराटे (वय ३०, रा. वारजे गावठाण, रामनगर) यांना अटक केली आहे. याबाबत प्रगती यांच्या आई संगीता हरपाळे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मे 2019 ते तीन जानेवारी 2021 दरम्यान ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रगती व आरोपी विशाल याचे मे 2019 मध्ये लग्न झाले होते. तेव्हापासून प्रगती ही सासरी नांदत होती. लग्न झाल्यानंतर काही दिवसानी पती व त्याच्या नातेवाईकांनी प्रगती हिचा छळ सुरू केला. लग्नात 4 लाख रूपये खर्च झाला आहे. तू फुकटात आली आहेस. आम्हाला हुंडा म्हणून 50 हजार व दिवाळीला सासरच्या लोकांना देण्यासाठी 2 तोळे सोने घेऊन ये, नाहीतर तुला नांदविणार नाही. यासाठी सतत टोचून बोलून शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून रविवारी दुपारी प्रिती यांनी आत्महत्या केली. अधिक तपास वारजे पोलिस करत आहे.

तर विवाहितेच्या छळाची दुसरी घटना मुंढवा भागात घडली आहे. याप्रकरणी २६ वर्षीय महिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती बशीर अहमद, सासू हसीना, दीर रियाज अहमद, नणंद नूरजहाँ यांच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फिर्यादी यांना माहेरून इलेक्ट्रीकचे दुकान सुरू करण्यासाठी पैसे आणण्यास सांगत होते. त्याला विवाहितेने नकार दिल्यानंतर तिचा छळ सुरू केला. याप्रकरणी मुंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

तसेच सिंहगड रोडवरील गणेश मळा येथे विवाहितेचा 15 लाख व कार घेऊन येण्यासाठी छळ केला आहे. याबाबत दत्तवाडी पोलिस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 30 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यानुसार सुमित सुधीर पांढरे, सुधीप नारायम पांढरे आणि अमित सुधीर पांढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे लग्न झाल्यापासून आरोपी हे त्यांना सतत माहेरून पैसे आणण्यासाठी छळ करत होते. पैसे व कार न आल्यामुळे त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.