पुणेकरांचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातील ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोरोना काळात पुणे पोलीस दल रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. कर्तव्य बजावत असताना कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने पुणे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण होत आहे. पुणे जिल्ह्याचे रक्षण करणाऱ्यां पोलीस दलात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस दलात आतापर्यंत 300 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. 300 पैकी 97 जणांवर उपचार सुरु आहेत तर इतर सर्व कोरोनामुक्त झाल्याचे सुत्रांनी सांगितले. पुण्यात आतापर्यंत 3 पोलिसांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे थेट लोकांच्या संपर्कात येणाऱ्या पोलिसांना पीपीई किट देण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलात तीन हजार पीपीई किट वाटप करण्यात येणार आहे. वैष्णवी महिला उन्नती संस्थेतर्फे पोलिसांनी हे पीपीई किट आणि मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने अनेक भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे हे लॉकडाऊनमध्ये चक्क सायकलवरून पेट्रोलिंग करत आहेत. त्यांच्या अंतर्गत तब्बल 14 कंटेन्मेंट झोन असल्याने पोलिसांनी गल्ली बोळ पत्रे आणि बांबूने सील केले आहेत.यामुळे घेवारे यांनी स्वत:च सायकलवर पेट्रोलिंग सुरु केले आहे. तसेच ते नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like