Pune News : कोथरूडमधील 31 वर्षीय प्रितीनं IT इंजिनिअर दीपकला SORRY चा मेसेज पाठवला, पती धावात घरी आल्यावर दिसला पत्नीचा मृतदेह, नातेवाईकांचा खुनाचा संशय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोथरुड परिसरात 31 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोस्टमार्टम राखून ठेवण्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रिती दीपक काकडे (वय 31, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिती व त्यांचे पती कोथरुड येथील भीमसेन उद्यान जवळील परिसरात राहतात. दीपक हे आयटी इंजिनिअर आहेत. त्यांना एक पाच वर्षांची मुलगी आहे. प्रिती या गृहिणी आहेत.

दरम्यान, त्यांचे घरघुती वाद होते, असे सूत्रांनी सांगितले. या वादातूनच प्रिती यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान त्यांनी पतीला ‘सॉरी’ असा मॅसेज केला. हा मॅसेज पाहून पती दिपक धावत घरी आले. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. त्यांनी थेट दरवाजा तोडला. तर आतमध्ये मृतदेह दिसून आला. मृतदेह दोरी तुटून खाली पडला होता. यानंतर ही माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे.

मात्र प्रिती यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला असून, हा खून असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोस्टमार्टम झालेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

ती खेळत होती आणि आईने गळफास घेतली

प्रीती यांना एक पाच वर्षांची मुलगी आहे. पती नोकरीला गेल्यानंतर दुपारी प्रिती यांनी पती दीपक यांना ‘सॉरी’ असा मॅसेज पाठवला. त्यानंतर ते धावत आले. त्यावेळी त्यांना पत्नीने आत्महत्या केलेले दिसून आले. पण त्याचवेळी ती 5 वर्षांची चिमुकली खेळत होती, हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी देखील हळहळ व्यक्त केली.