Pune News : मुंढव्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या आवारातून 4 चंदनाच्या झाडांची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंढव्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे आवारातून चार (Thief) चंदनाची झाडे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल सकाळी हा प्रकार समोर आला असून, मध्यरात्री हे झाडे चोरून नेण्यात आली आहेत.

याप्रकरणी संभाजी बर्गे (वय 56) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घोरपडी परिसरात रहातात. तर मुंढव्यात पिंगळे वस्तीत आर्मीस्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आहे. येथे बंगला क्रमांक चारमध्ये राहुल पाटील राहतात. दरम्यान याठिकाणी फिर्यादी हे सिक्युरिटी ऑफिसर आहेत. यावेळी त्यांना राहुल पाटील यांनी कळविले की आवारातून 4 चंदनाची झाडे चोरुन नेण्यात आली आहेत. त्यानुसार त्यानी पाहिले असता हा प्रकार समोर आला. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.