pune news | कौतुकास्पद ! पुणे जिल्ह्यातील 4 वर्षांच्या ईशानवीने रचला जागतिक विक्रम; अवघ्या 3 मिनिटांत ओळखले तब्बल 195 देशांचे ध्वज

पुणे / मंचर : पोलीसनामा ऑनलाइन – pune news | काही कला लहान मुलांच्यात देखील उत्कृष्टप्रकारे असतात. तीच कला कधी कधी आकाशाला गवसणी देखील घालू शकते. कोण खेळात आपली कामगिरी दाखवतं तर कोणी आपल्या बुद्धीतून दाखवतं. अशीच एक पुणे जिल्ह्यातील (Pune District) चिमूरडीनं जागतिक पातळीवर विक्रम जमा केली आहे. दुबईत झालेल्या एका अनोख्या स्पर्धेत (Dubai Competition) आपल्या बुद्धिकौशल्यातून त्या चिमुरडीने अवघ्या 3 मिनिटात तब्बल 195 देशांचे ध्वज ओळखले आहे. ईशानवीचं वय केवळ 4 वर्ष असून, सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

मूळचे आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) असणारे चिंचोडी देशपांडे येथील बाळासाहेब आढळराव-पाटील हे व्यवसाय निमित्त दुबई येथे स्थायिक झालेत. त्यांची 4 वर्षे 11 महिन्यांची कन्या ईशानवी बाळासाहेब आढळराव-पाटील (Ishanavi Balasaheb Adhalrao-Patil) हिने अनेक विक्रमांना गवसणी घातलीय. 15 जून रोजी झालेल्या दुबई येथे एका अनोख्या स्पर्धेत ईशानवी हिने यश संपादन केलं आहे. तिने 195 देशांचे झेंडे ओळखून त्यांच्या राजधान्या केवळ 3 मिनिटे 10 सेकंद इतक्या फास्ट स्पीडने सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे. तिने जागतिक विक्रम केला आहे. विशेष म्हणजे, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड (International Book Of Records), इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड (Asia Book of Records) या तीनही ठिकाणी तिच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.

या दरम्यान, कोणतीही गोष्ट विश्वासाने आत्मसात करण्यासाठी ईशानवीमध्ये असलेली जिद्द आणि चिकाटी कौतुकास्पद आहे,
अशी एक आनंदी प्रतिक्रिया तिची आई नीता आढळराव आणि भाऊ आराध्य आढळराव यांनी व्यक्त केलीय.
जागतिक विक्रमाची नोंद केल्याने तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
विशेष म्हणजे आंबेगाव तालुक्याचे नाव ईशानवीमुळे आता जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार हे नक्कीच आहे.

Web Titel :- pune news | 4 year old girl from pune sets world record in dubai

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fire at CBI office । दिल्लीतील CBI मुख्यालयाला आग; अधिकारी बाहेर पळाले, 5 अग्निशमन गाड्या दाखल

Sanjay Raut | नारायण राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी; राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, ₹ 8,750 स्वस्त झाले सोने, जाणून घ्या दर

प्रकृती बिघडल्याने खडसेंची पत्रकार परिषद रद्द ! ईडीच्या चौकशीला हजर राहणार काय याकडे लक्ष