Pune News | नवले ब्रिजजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 43 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर सरदेशपांडे यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News नवले ब्रिजजवळ Navale Bridge भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत एका सिव्हिल इंजिनिअरचा Civil Engineer मृत्यू झाला आहे. अद्याप तरी या वाहन चालकाचा Driver शोध लागलेला नाही.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अमित शेषराव सरदेशपांडे (वय 43, सनसिटी, आनंदनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमित यांचे सासरे धनंजय मारणे (रा. शनिवार पेठ) यांनी सिंहगड रोड पोलीस Sinhagad Road Police (Pune News) ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हे सिव्हिल इंजिनिअर होते. लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली होती. सध्या ते घरीच असायचे. दरम्यान ते काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी जात होते. वडगाव ब्रिज Wadgaon Bridge ते नवले ब्रिज सर्व्हिस रोडने जात असताना चैतन्य बिअर शॉपी समोर अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू Death झाला. अपघातानंतर Accident वाहन चालक न थांबता तेथून पसार झाला. माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, उपनिरिक्षक धोत्रे व पथकाने धाव घेतली. पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेतला जात आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  Pune News 43 year old Civil Engineer Amit Sardeshpande dies in collision with heavy vehicle near Navale Bridge

हे देखील वाचा

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

कोट्यवधी केंद्रीय कर्मचार्‍यांना झटका ! मोदी सरकार करणार ‘या’ भत्त्यांमध्ये 20% कपात, जाणून घ्या का घेतला निर्णय?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा